![]()
गेल्या चार दिवसांपासून राज्याच्या विविध भागात सुरू असलेला पावसाचा जोर शनिवारी मंदावला. बंगालचा उपसागर तसेच राजस्थानवर कमी दाबाच्या क्षेत्रामुळे महाराष्ट्राकडे बाष्पयुक्त वारे येत आहेत. म्हणून रविवारी रायगड, रत्नागिरी तसेच सातारा घाट परिसरात ऑरेंज तर
.
दुसरीकडे खान्देश, नाशिकपासून सांगली-सोलापूरपर्यंतच्या मध्य महाराष्ट्रातील १० आणि मराठवाड्यातील ८ अशा एकूण १८ जिल्ह्यांत ५ दिवस म्हणजे २७ ते ३१ जुलैपर्यंत पाऊस उसंत (ब्रेक) घेणार आहे. या कालावधीत विदर्भात हलका ते मध्यम पाऊस सुरू राहणार आहे, असे हवामान तज्ज्ञांनी सांगितले.
दरम्यान, गेल्या ४ दिवसांतील तसेच जुलैतील पावसाने राज्यांतील धरणांचा साठा ५६ टक्क्यांवर गेला. अर्थात पश्चिम, मध्य महाराष्ट्रातील धरण क्षेत्रात मुबलक पाऊस झाल्याने हा साठा वाढला आहे. मराठवाडा, विदर्भ, तसेच उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव जिल्ह्यात दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.
मान्सूनचे वारे मंदावणार
बंगालच्या उपसागरातील उंचीवरील हवेचे तीव्र कमी दाबाचे क्षेत्र पूर्व उत्तर प्रदेशकडे सरकणार असल्यामुळे, अरबी समुद्रातून महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर धडकणारे सध्याचे बळकट मान्सून वारे काही प्रमाणात मंदावणार आहेत. यामुळे पुढील ५ दिवस पावसाचा जोर ओसरून कोरडे किंवा हलके हवामान राहण्याची शक्यता आहे. – माणिकराव खुळे, हवामान तज्ज्ञ
राज्यातील जलस्थिती विभाग साठा टक्के पुणे ३६८.५ ६८ कोकण १०२.३ ७९ नाशिक १२२.६ ५८ नागपूर ७८.६ ४७ अमरावती ५९.७ ४३ संभाजीनगर ७१.१ २८ (पाणी साठा टीएमसीमध्ये)