![]()
सारोळा ‘वृक्षवल्ली, सिल्लोड’च्या वतीने सारोळा येथील जिल्हा परिषद शाळेत आ योजित वृक्षवाटप कार्यक्रमादरम्यान विशेष योगदान देण्यात आले. या वेळी शाळेची शैक्षणिक गुणवत्ता, विद्यार्थ्यांमधील संस्कार, विज्ञानाधारित उपक्रम आणि संवर्धनासाठी राबवले जाणारे उपक्रम पाहून सर्वजण भारावून गेले. परिसरात विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात वृक्षारोपण व संवर्धनाचा संदेश देत या कार्यक्रमात सहभाग घेतला. प्रत्येक विद्यार्थ्याच्या हातात एक रोप आणि चेहऱ्यावर पर्यावरण रक्षणाचा निर्धार दिसून येत होता. या प्रसंगी विद्यार्थ्यांना प्रत्येक रोपाचे संगोपन करण्याची शपथ देण्यात आली. शाळेतील डिजिटल लायब्ररी, विज्ञानाधारित शैक्षणिक उपक्रम, स्वच्छ व हिरवाईने नटलेला परिसर तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबवले जाणारे उपक्रम विशेष लक्षवेधी ठरले. ग्रामीण भागातील ही जिल्हा परिषद शाळा आधुनिक शिक्षणासोबत संस्कार आणि पर्यावरण संवर्धनाचा उत्कृष्ट संगम घडवत असल्याचे जाणवले. या वृक्षवाटप कार्यक्रमात ‘वृक्षवल्ली, सिल्लोड’चे डॉ. शेखर दौड, योगेश दिवटे यांच्यासह संपूर्ण वृक्षवल्ली टीम उपस्थित होती. कार्यक्रमास मुख्याध्यापक बावस्कर सर, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गजानन गोरे, उपाध्यक्ष बबन वराडे, सरपंच मोहन गायकवाड, उपसरपंच नारायण वराडे, पोलीस पाटील सुधाकर काकडे, शेतकरी पुत्र प्रसाद वराडे, पंडित सर, तुकाराम वराडे यांच्यासह सर्व शिक्षकवृंद आणि ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहकार्य केले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी पर्यावरण संरक्षणाचा संकल्प केला. सारोळा येथील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी वृक्ष लागवड उपक्रमात सहभाग नोंदवला.
Source link
साराेळा येथील शाळेत कार्यक्रम:विद्यार्थ्यांनी दिला वृक्षसंवर्धनाचा संदेश, प्रत्येक विद्यार्थ्यास एक वृक्ष भेट