![]()
नवी दिल्लीतील जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीने शनिवारी, २५ जुलैला निदर्शने केलीू . इर्विन चौक स्थित डॉ. आंबेडकर यांना अभिवादन करून आंदोलन केले. केंद्र शासनाविरुद्ध प्रदर्शन करतानाच शिक्षण व्यवस्थेत पारदर्शकतेची मागणी यावेळी केली . आंदोलनाच्या शेवटी शिक्षण व्यवस्थेतील अनियमितता दूर करून परीक्षा व प्रवेश प्रक्रियेत पारदर्शकता आणावी, अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाकडे पाठवण्यात आले. ग्रामीण काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, खासदार बळवंत वानखडे, प्रा. विरेंद्र जगताप आदींनी या आंदोलनाचे नेतृत्व केले. परीक्षा प्रक्रियेमधील अनियमितता, पेपरफूट, प्रवेश प्रक्रियेतील गोंधळ शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचार यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे शिक्षण क्षेत्रात व्यापक सुधारणा करणे आवश्यक आहे, असे मत यावेळी आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केले. आंदोलनात हरिभाऊ मोहोड, प्रकाश काळबांडे, रामेश्वर अभ्यंकर, प्रवीण मनोहर, श्रीकांतराव गावंडे, अरविंदराव लंगोटे, भय्यासाहेब मेटकर, समीर पाटील, समाधान दहातोंडे, सुनील गावंडे, नितीन देशमुख, पंकज वानखडे, संजय बेलोकर, प्रमोदराव दाळू, अमोल होले, अमोल धवसे, श्रीनिवास सूर्यवंशी, नामदेवराव तनपुरे, श्रीकांतराव झोडपे, चंदू डहाणे, अनिकेत डेंगळे, नितेश वानखडे, परिक्षीत जगताप, सागर देशमुख, समीर जवंजाळ आदींचा सहभाग होता. राष्ट्रपती आणि राज्यपालांना निवेदन परीक्षांमधील अनियमितता, व्यवस्थात्मक अपयशावर संसदेत चर्चा घ्यावी, दिल्लीतील आंदोलनात विद्यार्थी, शांततापूर्ण निदर्शकांवर दाखल एफआयआर मागे घ्यावेत, या मागण्या निवेदनात नमूद आहेत. हे निवेदन राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल, मुख्यमंत्री, केंद्रीय व राज्यस्तरीय अधिकाऱ्यां पर्यंत पाठविण्याची विनंती जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात आली.
Source link
जिल्हा काँग्रेसची इर्विन चौकात निदर्शने:शिक्षण व्यवस्थेमध्ये पारदर्शकतेच्या मागणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन केले सादर