![]()
परीक्षेच्या व्यवस्थेविरोधात जेन झीने आंदोलन केले. तरुणाईच्या एकजुटीपुढे ही हिटलरशाही झुकली आहे, अशा शब्दांत शिवसेना (उबाठा) पक्षाचे उपनेते आमदार नितीन देशमुख यांनी भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारवर टीका केली. भारतात लोक नव्हे, तर झुरळे राहतात, अशा पद्धतीने सत्ताधारी भाजपचे नेते नागरिकांशी वागत आहेत. मात्र तरुणाईच्या एकजुटीपुढे सरकारला झुकावे लागले. नीट पेपरफुटीप्रकरणी देशभर उसळलेल्या संतापानंतर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला. हा तरुणांच्या लढ्याचा विजय असून मोदी सरकारच्या अहंकाराचा पराभव आहे, असे टिकास्त्रही आमदार देशमुख यांनी डागले. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्या सरकारला अखेर जनआक्रोशापुढे माघार घ्यावी लागली. ही केवळ एका मंत्र्याची हकालपट्टी नसून देशातील तरुणांच्या एकजुटीचा विजय आहे, असेही आमदार देशमुख म्हणाले. यावेळी उद्धवसेनेचे जिल्हाप्रमुख गोपाल दातकर यांनीही केंद्र सरकारवर कठोर शब्दांत टीका केली. मोदींनी राजीनामा द्यावा भाजपच्या बारा वर्षांच्या सत्ताकाळात तब्बल १५७ वेळा विविध भरती व स्पर्धा परीक्षांचे पेपर फुटले आहेत. हा जात-पात किंवा राजकारणाचा मुद्दा नाही. हा देशातील प्रत्येक विद्यार्थ्याच्या भविष्याचा प्रश्न आहे. तरुणांचे भविष्य अंधकारमय करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी अपयशी ठरले असून त्यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यावा, अशीही मागणी आमदार नितीन देशमुख यांनी केली आहे.
Source link
तरुणाईच्या एकजुटीपुढे हिटलरशाही झुकली:उद्धवसेनेचे आमदार नितीन देशमुख यांची केंद्र सरकारवर जहरी टीका