![]()
येथील सरदवाडी रोडवरील रामेश्वर महादेव मंदिर परिसरात नवसंजीवन वृक्षारोपण अभियान उत्साहात पार पडले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भाजप नाशिक जिल्हा चिटणीस मीरा सानप यांच्या संकल्पनेतून या सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
.
या अभियानास ज्येष्ठ नेते भाऊसाहेब शिंदे, जयंत आव्हाड, बाळासाहेब हांडे व डॉ. दीपक श्रीमाली यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमादरम्यान दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त त्यांना भावपूर्ण अभिवादन करण्यात आले. या उपक्रमाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे महिलांचा उत्स्फूर्त सहभाग. स्थानिक महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून वृक्षारोपणात प्रत्यक्ष सहभाग नोंदविला. वृक्षारोपणाबरोबरच लावलेल्या रोपांचे संगोपन करण्याचाही संकल्प यावेळी करण्यात आला.
यावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस सुनील माळी, शहराध्यक्ष सज्जन सांगळे, महिला मोर्चाच्या शहराध्यक्ष देवयानी वाघ यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाचे उपस्थितांनी स्वागत करत अशा मोहिमा सातत्याने राबविण्याची अपेक्षा व्यक्त केली. प्रतिनिधी | सटाणा दिवंतगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सेवा सप्ताहांतर्गत गुरुवारी (दि. २३) महाराष्ट्रातील सर्वोच्च साल्हेर किल्ल्यावर ५६ वृक्षांचे रोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसचे बागलाण तालुकाध्यक्ष राजेंद्र सोनवणे यांच्या पुढाकारातून लिंब, आवळा, जांभूळ आदी विविध जातींच्या ५६ वृक्षांची लागवड करण्यात आली. या उपक्रमामुळे साल्हेर परिसरातील हरित क्षेत्र वाढण्यास, पर्यावरण संरक्षणासआणि पर्यटनस थळाच्या सौंदर्यात भर पडण्यास मदत होईल, असा विश्वास राजेंद्र सोनवणे यांनी व्यक्त केला. यावेळी ‘सेल्फी विथ किल्ला’, आशा वर्कर्स सन्मान सोहळा, वृक्षदिंडी आणि वृक्षारोपण असे विविध उपक्रम राबविण्यात आले. गड किल्ल्यांचे जतन व संवर्धनाबाबत जनजागृती व्हावी तसेच युवकांमध्ये ऐतिहासिक वारशाविषयी जागरूकता निर्माण व्हावी, या उद्देशाने आयोजित ‘सेल्फी विथ किल्ला’ उपक्रमाला शहर व तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि पर्यटकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. दुर्गम आदिवासी भागात आरोग्य सेवा पोहोचव णाऱ्या आशा वर्कर्सचाही यावेळी सन्मान करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषात कोसळत्या पावसातही उपस्थितांनी उत्साहाने सहभाग नोंदविला. यावेळी संदीप भामरे, संदीप वाघ, किशोर भामरे, नंदराज देवरे, हेमंत मगर आदी उपस्थित होते.