![]()
मान्सूनचे आगमन होताच अकोले तालुक्यातील भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात धुवांधार पावसाने हजेरी लावली आहे. चोहीकडे पसरलेली हिरवीगार शाल, डोंगरदऱ्यांमधून कोसळणारे फेसाळणारे धबधबे आणि धुक्याची दुलई यामुळे निसर्गाचे अलौकिक सौंदर्य फुलून आले आहे. या निस
.
पावसाळी पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी केवळ अहिल्यानगर जिल्ह्यासह मुंबई, पुणे, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर येथून दररोज ५ ते ७ हजारांहून अधिक पर्यटक दाखल होत आहेत. विशेषतः शनिवार आणि रविवारी सुटीच्या दिवशी पर्यटनस्थळांवर पर्यटकांची अभूतपूर्व गर्दी पाहायला मिळत असून, हा आकडा १५ हजारांच्या पार जात आहे.
तालुक्यातील भंडारदरा धरण, रंधा धबधबा, अमृतेश्वर मंदिर, कोकणकडा आणि रतनगड याभागातील शंभरहून अधिक हॉटेल्स, होम-स्टे आणि राहण्याची ठिकाणेहाऊसफुल झाली आहेत. काही जण मित्रपरिवारासह, तर काही जणकुटुंबासोबत या पावसाळी वातावरणाचा आनंद घेत आहेत. दुसरीकडे,अहिल्यानगर शहराच्या लगत असलेल्या पर्यटनस्थळांवरही वीकेंडलापर्यटकांची गर्दी उसळत आहे. ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेलाचांदबीबी महाल परिसर, निसर्गरम्य डोंगरगण, ऐतिहासिक गोरक्षनाथगड आणि वांबोरी घाट या परिसरातही दररोज १ ते दीड हजार स्थानिकपर्यटकांची वर्दळ सुरू झाली आहे. रिमझिम पाऊस आणि थंड हवेच्यागारव्यात हिरवाईने नटलेला परिसर पाहण्यासाठी नागरिकांची पावलेआपोआप या निसर्गरम्य ठिकाणांकडे वळत आहेत.
भंडारदरा परिसरातील धबधबे पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत आहे.
आकर्षणाचे केंद्र आणि वैशिष्ट्ये कळसुबाई शिखर (महाराष्ट्रातील सर्वोच्च १,६४६ मीटर उंच टोक), रंधा धबधबा (१७० फूट वरून कोसळणारा प्रचंड जलप्रपात), रतनगड व हरिश्चंद्रगड (ऐतिहासिक किल्ले व ट्रेकिंग), अमृतेश्वर मंदिर (सुमारे १,२०० वर्षे जुनी हेमाडपंती शिल्पकला) आणि सांदण दरी (२०० फूट खोल आशियातील सर्वात मोठी दरी) ही अकोले तालुक्यातील पर्यटनाची प्रमुख आकर्षणे आहेत.
सुरक्षेच्या कारणास्तव काही ठिकाणे बंद काही दिवसांपूर्वी हरिश्चंद्रगड परिसरात एक पर्यटक पाय घसरून पडल्याने मोठा अपघात टळला, तर गेल्या वर्षी सांदण दरीत युवती वाहून गेल्याची घटना घडली होती. पर्यटकांच्या सुरक्षेचा विचार करता प्रशासनाने ही धोकादायक ठिकाणे सध्या पर्यटनासाठी तात्पुरती बंद ठेवली आहेत.