Headlines

गुरूपाैर्णिमा उत्सव:शिर्डीत तीन लाखांवर येणार भाविक, आज 24 तास सुरू राहणार साई मंदिर‎




शिर्डीत ११७ व्या गुरुपौर्णिमा उत्सवासाठी शिर्डी सज्ज झाली आहे. मंगळवारपासून भाविक दाखल होण्यास सुरूवात झाली. ३० जुलैपर्यंत तीन लाखांहून अधिक भाविक उत्सवाला उपस्थित राहतील, असा अंदाज श्री साईबाबा संस्थानने व्यक्त केला. गतवर्षीपेक्षा ही संख्या ५० हजारांवर अधिक असणार आहे. यंदा चार लाख भाविकांच्या दर्शनाचे नियोजन केले आहे. मुख्य दिवशी म्हणजे २९ जुलै रोजी साई मंदिर रात्रभर खुले ठेवले जाणार आहे. भाविकांची गर्दी पाहता दर्शनाला साडेपाच ते सहा तासांचा वेळ लागण्याचा अंदाज आहे. यंदा मंदिर परिसरासह संपूर्ण शिर्डी शहर आकर्षक विद्युत रोषणाईने उजळून निघाले आहे. बंगळुरूचे दानशूर साईभक्त एस. प्रकाश यांच्या देणगीतून देशी-विदेशी फुलांनी मंदिर परिसर सजविण्यात आला. महाराष्ट्रासह गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि इतर राज्यांतून येणाऱ्या ४५ नोंदणीकृत पालख्या शिर्डीत दाखल होणार आहेत. पालखी मार्गांवर पावसाळी मंडप, पिण्याचे पाणी, वीज आणि सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने १,५०० हून अधिक कर्मचारी, पोलिस, बॉम्बशोधक व नाशक पथक, शीघ्र कृती दल, नागरी सुरक्षा कर्मचारी तैनात राहणार आहेत. अतिरिक्त निवास व्यवस्था संस्थानची बहुतांश भक्तनिवासे आधीच आरक्षित झाली आहेत. शिर्डीतील हॉटेल आणि लॉजेसमध्येही मोठ्या प्रमाणावर आरक्षण झाले आहे. गर्दी लक्षात घेऊन संस्थानने भक्तनिवास आणि साई धर्मशाळेत २८ हजार चौरस फूट क्षेत्रात तात्पुरती निवास व्यवस्था उभारली आहे. संस्थानच्या निवासस्थानी नियमित १७ हजार ७५९, तर तात्पुरत्या स्वरूपात २,५०० भाविकांची राहण्याची सोय करण्यात आली आहे. पहिल्या दिवशी गुरुदक्षिणेचा लेखाजोखा { एकूण देणगी : १ कोटी ५९ लाख ५४ हजार { सुवर्णदान : ८११.३७० ग्रॅम (१ कोटी २० लाख ८४ हजार) { रोख देणगी : ३६ लाख ५६ हजार { चांदी : १ किलो २०४ ग्रॅम साईबाबा अन्नदान मूर्ती (किंमत २.१४ लाख) { नक्षीकाम असलेला सुवर्ण मुकुट आंध्र प्रदेशातील साईभक्त श्रीनिवासराव यांनी अर्पण केला { जबलपूरचे अशोक कुमार शर्मा यांनी ६० ग्रॅम वजनाचा सोन्याचा मुकुट (८.५० लाख) { बडोद्याचे विजय बाळकृष्ण नाईक यांनी ५१.३७० ग्रॅम वजनाचे दोन सुवर्ण “ॐ’ (किंमत ८.३४ लाख) अर्पण केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *