![]()
हिंगोली शहरालगत कयाधूू नदी पात्राचे खोलीकरण झाल्यामुळे मागील चोविस तासात झालेल्या मुसळधार पावसातही परिसरातील पुराचा धोका कमी झाल्याने नागरीकांना काहीप्रमाणात का होईना दिलासा मिळाला आहे. या शिवाय नदीच्या पात्रात पाणी साठवणुकीत वाढ झाल्याचे चित्र आहे. हिंगोली शहरालगत कयाधू नदी वाहते. या नदीचे पात्र उथळ असल्याने पडलेला पाऊस वाहून जातो या शिवाय खोलीकरणा अभावी अरुंद झालेल्या पात्रामुळे मोठ्या पावसात नदीला पुर आल्यानंतर पुराचे पाणी परिसरातील वसाहतीमध्ये शिरल्याने मोठे नुकसान होत होते. शिवाय पावसाचे पाणी साठवणुकीसाठी उपाय योजना नसल्याने ऑक्टोबर अखेरपासूनच नदीचे पात्र कोरडेठाक पडू लागले होते. यावर उपाय योजना म्हणून जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली पालिकेच्या नगराध्यक्षा रेखा श्रीराम बांगर व नगरसेवकांनी कयाधूनदीच्या पात्राचे खोलीकरण करण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी आमदार संतोष बांगर यांनी आवश्यक ती मदत करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार उन्हाळ्यामध्ये जेसीबीच्या मदतीने कयाधू नदीच्या पात्राचे रुंदीकरण व खोलीकरण करण्याचे काम हाती घेण्यात आले. यामध्ये तब्बल तीन किलो मिटर अंतरापर्यंत नदीचेपात्र खोल करण्यात आले असून परिसरात स्वच्छता करून नदीपात्राचे रुंदीकरण करण्यात आले. संपूर्ण उन्हाळ्यात हे काम सुरु ठेवण्यात आले होते. नदीपात्राच्या खोलीकरण व रुंदीकरणातून तब्बल पाच लाख घनमिटर गाळ काढण्यात आला आहे. त्यामुळे नदीचे पात्र खोल झाले. दरम्यान, मागील चोविस तासात शहरासह जिल्हाभरात मुसळधार पाऊस झाला आहे. या पावसामुळे कयाधू नदीला मोठा पूर आला. नदीपात्र रुंद व खोल झाल्यामुळे शहरात नदी काठी असलेल्या वसाहतींना पुराचा फटका बसला नाही. त्यामुळे नागरीकांना काही प्रमाणात का होईना दिलासा मिळाला आहे. तर नदीपात्राच्या खोलीकरणामुळे पाणीसाठा देखील वाढण्यात झाली आहे. नदीचा पहिलाच पुर पाहण्यासाठी नागरीकांची मोठी गर्दी झाली होती.
Source link
हिंगोलीकरांना दिलासा:शहरात कयाधू नदीचे खोलीकरण झाल्याने पुराचा धोका कमी