Headlines

वाघाचा नाद कोल्हा-कुत्र्यांनी करू नये, संजय राऊतांचे तोंड म्हणजे गटार:जयकुमार गोरेंच्या समर्थनात सदाभाऊ खोत आक्रमक




ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर खासदार संजय राऊत यांनी केलेल्या आक्षेपार्ह टीकेनंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. रयत क्रांती संघटनेचे नेते आणि आमदार सदाभाऊ खोत यांनी संजय राऊतांवर अत्यंत बोचऱ्या शब्दांत पलटवार केला आहे. जयकुमार गोरे हे लोकमतातून निवडून आलेले आमदार आहेत. वाघाचा नाद कोल्हा-कुत्र्यांनी करू नये. संजय राऊतांचे तोंड म्हणजे गटारगंगा आहे, त्यात शुद्ध पाणी मिळेल अशी अपेक्षा कोणी ठेवू नये, अशा शब्दात सदाभाऊ खोत यांनी राऊतांवर निशाणा साधला आहे. तर जयकुमार गोरे नावाचा वाघ एकटा सर्वांना भिडायला काफी आहे, असा इशाराह त्यांनी राऊतांना दिला आहे. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे आता अस्तित्व राहिलेले नाही, ती पुढची निवडणूक अभिजित दिपकेंच्या नेतृत्वाखाली लढेल,”असा खोचक टोला लगावला होता. या विधानावर संतापलेल्या संजय राऊत यांनी जयकुमार गोरे यांच्यावर अत्यंत शिवराळ आणि आक्षेपार्ह भाषेत टीका केली होती. या टीकेनंतर भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले असून, गोरे यांनी कोण संजय राऊत? मी त्यांना ओळखत नाही, असा टोला लगावत राऊतांना दुर्लक्षित केले. सोलापुरात जोडेमार आंदोलन अन् पुतळा दहन संजय राऊत यांनी जयकुमार गोरे यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त विधानाचे तीव्र पडसाद सोलापूर जिल्ह्यात उमटत आहेत. मोहोळ तालुक्यातील अनगर या गावात भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार राजन पाटील यांच्या समर्थकांनी रस्त्यावर उतरून संजय राऊतांविरोधात जोरदार निदर्शने केली. राजन पाटील यांचे सुपुत्र अजिंक्यराणा पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्त्यांनी राऊतांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. यावेळी संतप्त कार्यकर्त्यांनी संजय राऊत यांच्या पुतळ्याला चपलांचा हार घातला आणि त्यानंतर पुतळ्याचे दहन करत आपल्या भावना व्यक्त केल्या. राऊतांविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याविरोधात कथित आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांच्याविरोधात सोलापुरात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजपचे स्वीकृत नगरसेवक मनीष केत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून फौजदार चावडी पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम 356(2) आणि 352 अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *