![]()
खामगाव पाटबंधारे उपविभाग खामगाव अंतर्गत येणाऱ्या खामगाव व जळगाव जामोद तालुक्यातील सात प्रकल्पांपैकी तीन प्रकल्पातील पाण्याच्या पातळीने शंभरी गाठली आहे. तर दोन प्रकल्प शंभरी गाठण्याच्या उंबरठ्यावर उभे आहेत. या दोन प्रकल्प क्षेत्रात आगामी दिवसात जोरदार
.
तीन प्रकल्पांतून विसर्ग यंदाच्या पावसाळ्यात जून व जुलै या २ महिन्याच्या कालावधीत झालेल्या पावसामुळे जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा, गोडाडा व धानोरा हे लघु प्रकल्प ३१ जुलै रोजी शंभर टक्के भरले आहे.आजच्या घडीला राजुरा प्रकल्पातून ३ सेमी, धानोरा प्रकल्पातून १ सेमी व गोडाडा या प्रकल्पातून २ सेमीने पाण्याचा विसर्ग सुरू असल्याची माहिती आहे.
ज्ञानगंगात अधिक साठा खामगाव व नांदुरा वासियांची तहान भागवणाऱ्या गेरू माटरगाव येथील ज्ञानगंगा या मध्यम प्रकल्पात ५ ऑगस्ट च्या सकाळी ८ वाजेपर्यंत ९४ टक्के उपयुक्त जलसाठा उपलब्ध आहे. यामुळे खामगाव व नांदुरा वासियांचा पाण्याचा प्रश्न आजच मिटल्यात जमा आहे.
शेतकऱ्यांसाठी आनंददायी आता यापुढे होणारा पाऊस शेतकऱ्यांसाठी आनंददायी ठरणार आहे कारण या प्रकल्पातून रब्बीचे उत्पादन घेण्यासाठी मागणी केलेल्या शेतकऱ्यांना पाणी मिळणार असून त्यामुळे शेतकऱ्यांना दुहेरी पीक घेण्यास खऱ्या अर्थाने मदत होणार आहे.
जिल्ह्यातील प्रकल्पनिहाय जलसाठा व टक्केवारी