![]()
राज्य सरकारने बीएचएमएस आणि सीसीएमपी डॉक्टरांना अॅलोपॅथिक डॉक्टरांच्या महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलवरील नाव नोंदणी करण्याच्या निर्णयाविरोधात खासगी वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टरांनी पुकारलेला संप मंगळवारसह बुधवारीही सुरूच होता. या संपामुळे अहिल्यानगर शहर व
.
दरम्यान, गुरुवारपासून खासगी डॉक्टरांकडून तातडीच्या सेवादेखील पूर्णपणे बंद ठेवल्या जाण्याचा इशारा देण्यात आला. यामुळे वैद्यकीय उपचारांसह शस्त्रक्रियांसाठी येणाऱ्या रुग्णांना शासकीय रुग्णालयाचा आधार घ्यावा लागणार आहे. या संपामुळे शहरासह जिल्ह्यातून आलेल्या रुग्णांना उपचार न घेताच खासगी रुग्णालयातून परतावे लागले. महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेजिडेंट डॉक्टर्स, इंडियन मेडिकल असोसिएशन आणि असोसिएशन ऑफ स्टेट मेडिकल इंटर्न्ससह सर्व स्पेशालिस्ट संघटनांनी या संपात सहभाग घेतला. सरकारच्या निर्णयाविरोधात गुरुवारी नियमित व आपत्कालीन सेवा पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय तातडीच्या बैठकीत घेतला आहे. बीएचएमएस, सीसीएमपी नोंदणी प्रक्रियेला तातडीने स्थगिती देऊन या प्रश्नावर त्वरित तोडगा काढावा, अशी मागणी बैठकीत करण्यात आली. या बैठकीसाठी ‘आयएमए’ अहिल्यानगर शाखेचे अध्यक्ष डॉ. धनंजय कुलकर्णी, सचिव डॉ. अमित कराड, डॉ. बापूसाहेब कांडेकर, डॉ. नरेंद्र वानखेडे, डॉ. निसार शेख उपस्थित होते.
वैद्यकीय शिक्षण आणि गुणवत्तेचा प्रश्न! राज्य सरकारच्या ९० दिवसांच्या ब्रिज कोर्सवर बीएचएमएस डॉक्टरांना अॅलोपॅथिक प्रॅक्टिस आणि एमएमसीवर नोंदणी देण्याच्या निर्णयावर तीव्र असंतोष आहे. “नीट’ परीक्षा देऊन एमबीबीएस पूर्ण करणाऱ्यांच्या गुणवत्तेचे काय, असा प्रश्न अॅलोपॅथी डॉक्टर विचारत आहेत. जर अवघ्या ३ महिन्यांच्या कोर्सने ही परवानगी मिळणार असेल, तर मग होमिओपॅथीचे स्वतंत्र शिक्षण आणि प्रवेश परीक्षांचा फार्स कशासाठी? असा मूलभूत प्रश्न अॅलोपॅथिक डॉक्टरांकडून व आयएमएकडून उपस्थित केला जात आहे. रुग्णांच्या हिताचा विचार करून संपाचे हत्यार उपसावे लागत असल्याचे संघटनेच्या डॉक्टरांकडून सांगितले जात आहे.
सिव्हिल, मेडिकल कॉलेजमध्ये अतिरिक्त सुविधा दिल्या जाणार ^”संपामुळे खासगी हॉस्पिटलमधील नियमित सेवा बंद राहणार आहेत. त्यामुळे शहरी व ग्रामीण भागातून येणाऱ्या रुग्णांना तातडीच्या उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालय व मेडिकल कॉलेज हा पर्याय राहणार आहे. त्यासाठी जिल्हा शासकीय रुग्णालय व मेडिकल कॉलेजमध्ये अतिरिक्त सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत. शिवाय त्यासाठी अतिरिक्त परिचारिका आणि डॉक्टरदेखील उपलब्ध राहतील.”– डॉ. संजय घोगरे, जिल्हा शल्यचिकित्सक.