Headlines

पुणे रुग्णवाहिकांचे सुधारित भाडेदर निश्चित:प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड यांची घोषणा; अंमलबजावणी न केल्यास दंड




पुणे, पिंपरी-चिंचवड आणि बारामती कार्यक्षेत्रातील रुग्णवाहिकांचे सुधारित भाडेदर लागू करण्यात आले आहेत. प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड यांनी ही माहिती दिली. रुग्णवाहिकेत रुग्ण बसल्यापासून परतीच्या अंतरासाठी हे नवीन दर लागू राहतील. निश्चित केलेल्या दरपत्रकाची काटेकोरपणे अंमलबजावणी न करणाऱ्या वाहन चालक आणि मालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे गायकवाड यांनी स्पष्ट केले. यामुळे रुग्णांना योग्य दरात सेवा मिळेल याची खात्री केली जाईल. सुधारित दरपत्रकानुसार, अवातानुकूलित मारुती व्हॅनसाठी 25 किलोमीटर किंवा दोन तासांसाठी 700 रुपये आकारले जातील. त्यानंतर प्रति किलोमीटर 16 रुपये, प्रति प्रतीक्षा तास 125 रुपये, तर प्रतिदिन किंवा 300 किलोमीटरसाठी 4 हजार रुपये दर असेल. इंधन, देखभाल, दुरुस्ती आणि चालकाशिवाय प्रतिदिन 1 हजार रुपये दर लागू राहील. अवातानुकूलित मारुती ईको आणि टाटा मॅजिकसाठी 25 किलोमीटर किंवा दोन तासांसाठी 900 रुपये निश्चित करण्यात आले आहेत. यानंतर प्रति किलोमीटर 17 रुपये, प्रति प्रतीक्षा तास 125 रुपये, तर प्रतिदिन किंवा 300 किलोमीटरसाठी 4 हजार 500 रुपये दर असेल. इंधन, देखभाल, दुरुस्ती आणि चालकाशिवाय प्रतिदिन 1 हजार 200 रुपये दर लागू राहील. अवातानुकूलित महिंद्रा बोलेरो आणि फोर्स क्रुझरसाठी 25 किलोमीटर किंवा दोन तासांसाठी 1 हजार 200 रुपये दर आकारला जाईल. त्यानंतर प्रति किलोमीटर 18 रुपये, प्रति प्रतीक्षा तास 150 रुपये, तर प्रतिदिन किंवा 300 किलोमीटरसाठी 5 हजार रुपये दर असेल. इंधन, देखभाल, दुरुस्ती आणि चालकाशिवाय प्रतिदिन 1 हजार 500 रुपये दर लागू राहील. अवातानुकूलित फोर्स टेम्पो ट्रॅव्हलरसाठी 25 किलोमीटर किंवा दोन तासांसाठी 1 हजार 500 रुपये दर निश्चित करण्यात आला आहे. यानंतर प्रति किलोमीटर 22 रुपये, प्रति प्रतीक्षा तास 175 रुपये, तर प्रतिदिन किंवा 300 किलोमीटरसाठी 7 हजार रुपये दर असेल. इंधन, देखभाल, दुरुस्ती आणि चालकाशिवाय प्रतिदिन 2 हजार रुपये दर लागू राहील. वातानुकूलित फोर्स टेम्पो ट्रॅव्हलर (आयसीयू) साठी 25 किलोमीटर किंवा दोन तासांसाठी 2 हजार 500 रुपये दर आकारला जाईल. त्यानंतर प्रति किलोमीटर 30 रुपये, प्रति प्रतीक्षा तास 250 रुपये, तर प्रतिदिन किंवा 300 किलोमीटरसाठी 10 हजार रुपये दर असेल. इंधन, देखभाल, दुरुस्ती आणि चालकाशिवाय प्रतिदिन 4 हजार रुपये दर लागू राहील. निश्चित केलेल्या भाडेदरापेक्षा जास्त भाडे आकारणाऱ्या वाहनमालक आणि चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. पहिल्या गुन्ह्यासाठी 5 हजार रुपये, दुसऱ्या गुन्ह्यासाठी 10 हजार रुपये, तर तिसऱ्या आणि त्यानंतरच्या प्रत्येक गुन्ह्यासाठी 20 हजार रुपये दंड आकारला जाईल, असेही गायकवाड यांनी सांगितले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *