Headlines

पालघरमध्ये सोमवारी रात्री 56 मिनिटांत 3.4 रिश्टरचे 2 धक्के:हानी नाही, जव्हार तालुक्यात 5 किमी खोलीवर केंद्र




पालघर जिल्ह्यात सोमवारी ५६ मिनिटांत ३.४ रिश्टर स्केलचे २ धक्के बसले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाली नाही. नाशिक आणि पालघर जिल्ह्यात गेल्या २ महिन्यांपासून सातत्याने भूकंपाचे धक्के बसत आहेत. त्याची दखल घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भूकंपाच्या धोक्याचे मूल्यांकन करण्याचे आदेश दिले आहेत. दुसरीकडे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन पथकाने पालघर जिल्ह्यात जनजागृतीची मोहीम हाती घेतली आहे. दोन तालुक्यांत जनजागृती सातत्याने भूकंपाचे धक्के बसत असल्याने राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाने मंगळवारी डेंगाचिमेट, हाडे, भारती विद्यापीठ (जव्हार), शासकीय आश्रमशाळा कान्हेरे (विक्रमगड) येथे विद्यार्थी, शिक्षक आणि रहिवाशांमध्ये जनजागृती केली. धक्क्यांदरम्यान शांत राहणे, मजबूत फर्निचरखाली आश्रय घेणे, डोक्याचे संरक्षण करणे आणि स्थिर राहणे याबद्दल उपस्थितांना शिक्षित केले. अफवा टाळण्याबद्दल, तसेच प्रशासकीय सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याबद्दलही मार्गदर्शन करण्यात आले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *