![]()
मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील विरारजवळील शिरसाट फाटा येथे वसई गुन्हे शाखा युनिट-२ ने सापळा रचून १ कोटी रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या. याप्रकरणी प्रदीप पाटील या संशयिताला अटक करण्यात आली आहे.
.
३० लाखांच्या मोबदल्यात १ कोटींच्या बनावट नोटा देण्याचे ठरले होते. पोलिसांनी बनावट ग्राहक बनून हा व्यवहार केला. ठरल्यानुसार आरोपी वाडा येथून कारने आला होता. या प्रकरणी मांडवी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. आधीच सापळा रचून बसलेल्या गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला जागीच ताब्यात घेतले. पोलीस अधिक तपास करत आहेत.
कारच्या सीटखाली लपवला होत्या आरोपींनी नोटा
गाडीची कसून पाहणी केली असता, सीटखाली लपवून ठेवलेल्या बॅगेत ५०० रुपयांच्या तब्बल २०,००० बनावट नोटा आढळून आल्या. या सर्व नोटांची एकूण दर्शनी किंमत १ कोटी रुपये आहे. पोलिसांनी तातडीने १ कोटींची रोकड आणि गुन्ह्यात वापरलेली कार जप्त करत गुन्हा दाखल केला आहे.
या बनावट नोटांची छपाई कुठे झाली? गुजरातहून आणलेल्या या नोटांचे मुख्य सूत्रधार कोण आहेत? आणि हे जाळे किती मोठे आहे? याचा सखोल तपास गुन्हे शाखेकडून सुरू आहे. या प्रकरणात आणखी मोठ्या आरोपींना अटक होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. यामध्ये आंतरराज्यीय रॅकेटची शक्यता व्यक्त केली जात आहे.