Headlines

युवक देशाच्या सामाजिक, आर्थिक व सांस्कृतिक विकासाचे प्रमुख घटक:डॉ. बाळासाहेब खेडकर यांचे प्रतिपादन, आंतरराष्ट्रीय युवा दिन उत्साहात‎



येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय येथे राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना आणि रेड रिबन क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय युवा दिन व नशा मुक्त भारत अभियान उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थ

.

या कार्यक्रमासाठी घोडेगाव ग्रामीण रुग्णालयाचे समुपदेशक डॉ. दीपक पंजाबी प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना आरोग्य, व्यसनमुक्ती तसेच एचआयव्ही संदर्भात सविस्तर मार्गदर्शन केले. संसर्गाची कारणे, प्रतिबंधात्मक उपाय, गैरसमज आणि वस्तुस्थिती याबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागृती निर्माण केली. युवकांनी आपल्या आरोग्याची काळजी घेत जबाबदार जीवनशैली स्वीकारावी तसेच संदर्भातील चुकीचे सामाजिक गैरसमज दूर करण्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवावा, असे आवाहन त्यांनी केले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना आरोग्यविषयक महत्त्वपूर्ण माहिती मिळाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गोरक्षनाथ कल्हापुरे होते. अध्यक्षीय भाषणातून त्यांनी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची सामाजिक व राष्ट्रीय जबाबदारी अधोरेखित केली.

युवकांनी केवळ शैक्षणिक प्रगतीपुरते मर्यादित न राहता सामाजिक प्रश्नांविषयी संवेदनशील राहावे. समाजाच्या विकासात सहभाग घ्यावा आणि आपल्या ज्ञानाचा उपयोग राष्ट्रनिर्मितीसाठी करावा, असे त्यांनी सांगितले. आजचा युवक हा उद्याच्या भारताचा कर्ता-धर्ता असून त्याने सकारात्मक विचार, शिस्त, आत्मविश्वास आणि सामाजिक बांधिलकी जोपासणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. रविना शेडगे यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन राष्ट्रीय छात्र सेना प्रमुख मेजर डॉ. सुरेश जाधव यांनी केले. कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक-प्राध्याप िका, राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना व रेड रिबन क्लबचे स्वयंसेवक तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विद्यार्थ्यांनी घेतली व्यसनमुक्तीची शपथ डॉ. शरद औटी यांनी विद्यार्थ्यांना नशामुक्तीची शपथ दिली. विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारच्या व्यसनापासून दूर राहण्याचा तसेच स्वतःसोबतच आपल्या मित्रपरिवारात आणि समाजात व्यसनमुक्तीचा संदेश पोहोचविण्याचा संकल्प केला. युवकांचे आरोग्य, व्यक्तिमत्त्व विकास आणि उज्ज्वल भवितव्य यासाठी व्यसनमुक्त जीवनशैली किती महत्त्वाची आहे, याबाबतही यावेळी जागृती करण्यात आली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *