![]()
अपात्र होणाऱ्या व्यक्तीला मुख्यमंत्री केले इथेच निवडणूक आयोगाने शेण खाल्लं, त्यांनी आमचा बाजू कधीच ऐकूण घेतली नाही. या सर्व गोष्टीचे निर्माते अमित शहा हे आहेत, ते आता तोंड लपवून पळत आहेत, असे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. परराष्ट्र धोरण ही फार मोठी गोष्ट आहे, त्यामाध्यमातून देशाची प्रतिमा उंचवण्याचे काम करत असते. केवळ लोकांना मिठी मारणे म्हणजे परराष्ट्र धोरण नाही. संजय राऊत म्हणाले की, देशाच्या पंतप्रधानांनी संविधानाची प्रतिमा डागाळली त्यांचे काय? ज्या पद्धतीने डिलिमिटेशन बिल मंजूर करण्यासाठी वेगवेगळे पक्ष फोडले हे सुद्धा संविधान डागाळण्यासारखेच आहे ना? पक्ष फोडणे हे काय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचे काम आहे का? असा सवाल राऊत यांनी केला आहे. देशात बेरोजगारी आणि महागाई वाढली आहे, त्यांना यावर बोलता येईल का? यांना 2029 पूर्वी जावे लागेल अशी परिस्थिती जागतिक स्तरावर निर्माण झाली आहे.
कोर्टाने आम्हाला पुरेसा वेळ दिला संजय राऊत म्हणाले की, शिवसेना पक्ष आणि चिन्ह सुनावणीसाठी सुप्रीम कोर्टाने आम्हाला पुरेसा वेळ दिला आहे, निवडणूक आयोग आणि अमित शहा यांनी एकत्र येत आमचा पक्ष आणि चिन्ह शेकडो कोटी रुपयांना विकले. हे काही धार्मिक काम नाही. अमित शहा आणि निवडणूक आयोगाने शेकडो कोटी रुपयांचा व्यवहार केला, यावर सध्या युक्तिवाद सुरू आहे. दुसरा निर्णय अपात्रतेचा आहे, अपात्र व्यक्तीला मुख्यमंत्री करण्याचे काम महाराष्ट्रात झालं. आमचा पक्ष विकला हेच माझे मत संजय राऊत म्हणाले की, मी केवळ कोर्टाने काय मत व्यक्त केले हे मी माध्यमांना सांगत असतो, आमचा पक्ष आणि चिन्ह निवडणूक आयोगाने विकला हे मत माझे कायम आहे. न्यायालयात दोन्ही बाजू ऐकूण घेतल्या जातात, त्यानंतर निर्णय घेतला जातो. पण निवडणूक आयोगाकडून आमची बाजू ऐकूण घेण्यात आली नाही. हे आम्ही सांगतो आहोत, निवडणूक आयोगाने शेणं खाल्लं. आम्ही कसे शेण भरवले, कोणाला विकत घेतले, कसे गुवाहटीला गेलो हे त्यांनी सांगितले पाहिजे.
Source link
केवळ लोकांना मिठी मारणे म्हणजे परराष्ट्र धोरण नाही:अपात्र व्यक्तीला मुख्यमंत्री बनवून निवडणूक आयोगाने शेण खाल्लं– संजय राऊत