![]()
फुलंब्री तालुक्यातील गेवराई पायगा गावचे सरपंच मंगेश संजय साबळे (२७) यांच्यावरील गुंडगिरी, शासकीय कामात अडथळा, खंडणीसारख्या गंभीर गुन्ह्यांची दखल घेत पोलिसांनी त्यांना दोन वर्षांसाठी तडीपार का करण्यात येऊ नये, अशी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. ८ ऑगस्ट रोजी बजावलेल्या या नोटिशीची मुदत संपूनही साबळे यांनी बाजू न मांडल्याने त्यांच्यावर एकतर्फी कारवाईची शक्यता आहे. साबळे यांच्यावर सिटी चौक, क्रांती चौक, जवाहरनगर, फुलंब्री ठाण्यांत ८ गंभीर गुन्हे दाखल आहेत. जमाव जमवणे, शासकीय कार्यालयांत अधिकाऱ्यांना वेठीस धरल्याचे आरोप त्यांच्यावर आहे. सुडातून कारवाई : साबळे दरम्यान, ही नोटीस राजकीय सुडातून बजावल्याचा आरोप मंगेश साबळे यांनी केला. गोरगरीब, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून आपल्याला जिल्ह्यातून बाहेर काढण्याचा हा डाव असल्याचे त्यांनी सांगितले. याविरोधात राज्यभर ‘भीक मांगो’ आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला. …तर एकतर्फी कारवाई : डीसीपी अतुलकर “स्वतःची बाजू मांडण्यासाठी साबळे यांना मुदत दिली होती. मात्र त्यांनी खुलासा केलेला नाही. कायद्याचा आदर न करता ते समाजमाध्यमांवर वक्तव्ये करत आहेत. ते हजर न राहिल्यास एकतर्फी अहवाल करून तडीपारीची कारवाई केली जाईल,’ असा इशारा पोलिस उपायुक्त पंकज अतुलकर यांनी दिला.
Source link
सरपंच मंगेश साबळेला 2 वर्षांसाठी तडीपारीची नोटीस:शासकीय कामात अडथळा, खंडणीसारखे गुन्हे