![]()
महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान (जिल्हास्तर) आणि लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेंतर्गत चांदवड शहरातील विविध विकासकामांसाठी ८ कोटी रुपयांच्या निधीस मंजुरी मिळाली आहे. उपनगराध्यक्ष भूषण कासलीवाल यांच्या विशेष प्रयत्नातून या कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली असून, निविदा प्रक्रियाही पूर्ण झाली आहे. त्यामुळे लवकरच कामांना सुरुवात होणार आहे. या निधीच्या मंजुरीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री गिरीश महाजन व आमदार डॉ. राहुल आहेर यांचे सहकार्य लाभल्याची माहिती उपनगराध्यक्ष भूषण कासलीवाल यांनी दिली. निधीतून शहरातील रस्ते, नाले, प्रकाश व्यवस्था, सार्वजनिक सुविधा व स्वच्छतेशी संबंधित विविध कामे करण्यात येणार आहेत. यामध्ये डांबर विहीर ते बागवान गल्ली, घोडकेनगर येथील हॉस्पिटल ते पारस डुंगरवाल यांच्या घरापर्यंत तसेच हॉटेल भैरवनाथ ते इंद्रायणी कॉलनी रस्ता काँक्रीटीकरण, प्रभाग ५ मध्ये पेव्हर ब्लॉक बसविणे, विविध ठिकाणी सिमेंट काँक्रीट बॉक्स कल्व्हर्ट उभारणे, अद्यावत मटन मार्केट, श्री गजानन महाराज मंदिर येथे सभामंडप, श्वान निवारा केंद्र, सौरऊर्जा स्ट्रीट लाईट, प्रभाग १६ मध्ये सार्वजनिक शौचालय व रोहिदास नगर येथे जिमखाना उभारण्याच्या कामांचा समावेश आहे. तसेच कालिका देवी रस्त्यावर ४० सोलर पथदिवे, दलित वस्ती भागात सौरऊर्जा हायमास्ट व सौर स्ट्रीट लाईट आणि शर्मा वस्ती, गुरुकुल कॉलनी, बाजार तळ, नाईकवाडीपुरा व सावता नगर येथे सुसज्ज व डिजिटल अंगणवाडी इमारती उभारण्यात येणार आहेत.शहरातील विविध भागांतील रस्ते, पायाभूत सुविधा व नागरी सुविधांच्या कामांना प्राधान्य दिल्याने नागरिकांना याचा मोठा फायदा होणार आहे. नागरिकांना मिळणार सुविधा शहरातील रस्ते आणि इतर पायाभूत सुविधांना या कामांमध्ये प्राधान्य देण्यात आले आहे. यामुळे चांदवडमधील नागरिकांना येत्या काळात मोठा दिलासा मिळणार असून शहराचा चेहरामोहरा बदलण्यास मदत होणार आहे. सर्व प्रशासकीय आणि निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्याने आता प्रत्यक्ष कामाचा मार्ग मोकळा झाला असून लवकरच या विकासकामांचा शुभारंभ केला जाईल. शहराच्या विकासासाठी आणि जनहितांच्या कामांसाठी नेहमीच कटिबद्ध आहे. – भूषण कासलीवाल, उपनगराध्यक्ष, चांदवड
Source link
चांदवड शहरातील प्रलंबित विविध विकासासाठी 8 कोटींचा निधी मंजूर:निविदा प्रक्रिया पूर्ण, लवकरच कामांना होणार सुरूवात