Headlines

राहुल गांधींच्या पुण्यातील ‘छात्रों की गूंज’ला अखेर पोलिसांची परवानगी:30 कठोर अटी, ड्रोनपासून ‘डी-झोन’ बॅरिकेडिंगपर्यंत नियम




लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या 22 ऑगस्ट रोजी पुण्यात होणाऱ्या ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमाला अखेर पुणे पोलिसांनी परवानगी दिली आहे. मात्र, ही परवानगी तब्बल 30 अटी आणि शर्तींसह देण्यात आली आहे. पुण्यातील एस.एस.पी.एम. मैदानावर होणाऱ्या या कार्यक्रमासाठी सुरक्षा, गर्दी नियंत्रण, वाहतूक, अग्निसुरक्षा, ध्वनीप्रदूषण आणि महिला सुरक्षेबाबत पोलिसांनी आयोजकांना स्पष्ट निर्देश दिले आहेत. विशेष म्हणजे, कार्यक्रमाच्या ठिकाणी ड्रोनद्वारे छायाचित्रण करण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. राहुल गांधी यांच्या सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर व्यासपीठाचा परिसर अतिसुरक्षित ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने विद्यार्थिनी उपस्थित राहण्याची शक्यता असल्याने महिला सुरक्षेसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत. परवानगीवरून काँग्रेस-पोलिसांमध्ये निर्माण झाला होता तणाव 22 ऑगस्ट रोजी पुण्यात ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रम होणार असल्याचे काँग्रेसकडून जाहीर करण्यात आले होते. मात्र, कार्यक्रमाची तारीख जवळ येऊनही पोलिसांची परवानगी मिळाली नसल्याने काँग्रेसकडून नाराजी व्यक्त करण्यात आली होती. पुणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी परवानगी न मिळाल्यासही कार्यक्रम घेण्याची भूमिका जाहीर केली होती. पोलिसांनी परवानगी द्यावी किंवा देऊ नये, कार्यक्रम होणारच, असा आक्रमक पवित्रा त्यांनी घेतला होता. त्यानंतर पोलिसांकडून कार्यक्रमाला परवानगी दिली जाणार की नाही, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. अखेर पोलिसांनी कार्यक्रमाला परवानगी देत काँग्रेसला मोठा दिलासा दिला; मात्र त्याचवेळी सुरक्षा आणि कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने कठोर अटी लागू केल्या आहेत. कार्यक्रमासाठी 30 अटी; नेमके कोणते नियम? 8 ते 10 हजार विद्यार्थिनी सहभागी होण्याची शक्यता काँग्रेसच्या माहितीनुसार, या कार्यक्रमाचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे राहुल गांधी विद्यार्थिनींशी थेट संवाद साधणार आहेत. कार्यक्रमासाठी सुमारे 8 ते 10 हजार विद्यार्थिनी उपस्थित राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. पुणे हे महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या कार्यामुळे स्त्री शिक्षणाच्या इतिहासातील महत्त्वाचे शहर आहे. त्यामुळे याच पुण्यात विद्यार्थिनींसाठी विशेष संवादाचे आयोजन करण्यात आल्याचे काँग्रेसकडून सांगण्यात येत आहे. राहुल गांधी यांच्याशी संवाद साधताना विद्यार्थिनींना थेट प्रश्न विचारण्याची संधी मिळणार आहे. पेपरफुटी, शिक्षणाचा वाढता खर्च, विद्यार्थ्यांचे अधिकार, रोजगार आणि मुली व महिलांच्या सुरक्षेसह विविध मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. राहुल गांधींच्या ‘छात्रों की गूंज’ अभियानाचा उद्देश विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या आणि अपेक्षा ऐकणे हा असल्याचे काँग्रेसकडून सांगण्यात आले आहे. या अभियानाची सुरुवात राजस्थानातील कोटा येथून करण्यात आली होती. ‘मुली बोलतील, देश ऐकेल’ अशी काँग्रेसची भूमिका पुण्यातील कार्यक्रमाला विशेषतः विद्यार्थिनींवर केंद्रित करण्यात आले आहे. राहुल गांधींच्या या अभियानातून तरुणांच्या प्रश्नांना राष्ट्रीय राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आणण्याचा काँग्रेसचा प्रयत्न असल्याचे दिसून येते. यापूर्वीच्या कार्यक्रमांमध्येही राहुल गांधी यांनी पेपरफुटी, बेरोजगारी, शिक्षणातील वाढता खर्च आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवरून केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. त्यामुळे पुण्यातील कार्यक्रमात राहुल गांधी कोणते मुद्दे मांडतात आणि विद्यार्थिनींकडून त्यांना कोणते प्रश्न विचारले जातात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. परवानगी मिळाल्याने राजकीय संघर्षाला तूर्त विराम कार्यक्रमाला परवानगी मिळाल्याने काँग्रेस आणि पुणे पोलिसांमधील तणावाला तूर्त विराम मिळाला आहे. मात्र, 30 अटींच्या माध्यमातून पोलिसांनी आयोजकांवर मोठी जबाबदारी सोपवली आहे. विशेषतः ड्रोनबंदी, प्रवेश नियंत्रण, सीसीटीव्ही, ‘डी-झोन’ बॅरिकेडिंग, महिला सुरक्षाव्यवस्था आणि आपत्कालीन मार्ग या अटी राहुल गांधी यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या ठरणार आहेत. आता 22 ऑगस्ट रोजी कार्यक्रम प्रत्यक्षात कशा पद्धतीने पार पडतो, किती विद्यार्थी आणि विद्यार्थिनी सहभागी होतात आणि राहुल गांधी कोणते राजकीय आणि शैक्षणिक मुद्दे उपस्थित करतात, याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. हेही वाचा… चित्रपटांचे हिरो यांच्यासमोर झिरो:काँग्रेस नेते अमित देशमुख यांचे खणखणीत भाषण, म्हणाले- ‘मांजरा’ सरकार पुढची 50 वर्षे…! “ज्या क्षेत्रामध्ये लोकनेते आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचा विचार आला आणि त्याला सहकारमहर्षी आदरणीय दिलीपराव देशमुख साहेब यांच्या कर्तृत्वाची जोड मिळाली, तिथे कधीही मागे वळून पाहण्याची गरज भासली नाही. सरकारे 5, 10 किंवा 15 वर्षांत बदलतात, मात्र मांजरा परिवाराचे हे विश्वासाचे सरकार गेल्या 50 वर्षांत बदललेले नाही आणि पुढची 50 वर्षेही ते बदलणार नाही,” असे खणखणीत प्रतिपादन माजी मंत्री व काँग्रेस नेते अमित विलासराव देशमुख यांनी केले. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *