Headlines

नागपुरात 'लव्ह ट्रँगल'मधून कुख्यात गुन्हेगाराचा निर्घृण खून:चाकू अन् कुऱ्हाडीने वार करणाऱ्या आरोपीला अटक, पोलिसांकडून तपास सुरू




नागपुरातील नरेंद्र नगर येथील सुंदरबन परिसरात ‘लव्ह ट्रँगल’मधून निर्माण झालेल्या वादाचे पर्यवसान एका कुख्यात गुन्हेगाराच्या निर्घृण हत्येत झाले आहे. अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद असलेला गौरव रगडे (35) याच्यावर त्याच्याच मित्राने चाकू आणि कुऱ्हाडीने हल्ला करून त्याची हत्या केली. अर्धा तास रस्त्यावर सुरू असलेल्या जीवघेण्या धुमश्चक्रीनंतर पोलिसांनी मयताचा मित्र व मुख्य आरोपी गौरव प्रभाकर राऊत याला घटनास्थळावरूनच ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी पोलिसांनी दीपक वासनिक यालाही सह-आरोपी केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मयत गौरव रगडे याचे गेल्या दोन वर्षांपासून सुंदरबन परिसरातील ‘सपना’ नावाच्या तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. दरम्यान, यवतमाळच्या दिग्रस येथील रहिवासी असलेल्या गौरव राऊत याचीही सपनासोबत ओळख झाली आणि या मैत्रीचे रूपांतर प्रेमसंबंधात झाले. राऊत सपनासाठी नागपुरात राहायला आला होता आणि दोघांनी मिळून नरेंद्र नगर परिसरात ‘क्लाऊड किचन’ सुरू केले होते. सपनाच्या प्रेमावरून दोन्ही गौरव यांच्यात गेल्या काही दिवसांपासून तीव्र वाद सुरू होता. यातच आरोपी गौरव राऊत हा दोन आठवड्यांपूर्वीच एका गुन्ह्यातून जामिनावर बाहेर आला होता. दारूची पार्टी अन् खिडकीच्या काचा फोडल्या गुरुवारी सायंकाळी गौरव राऊत याच्या नरेंद्र नगर येथील भाड्याच्या घरात दारूची पार्टी सुरू होती. यावेळी सपनादेखील तेथे उपस्थित होती. या प्रकरणी गौरव रगडेला माहिती मिळताच तो राऊतच्या घरी पोहोचला. घर आतून बंद असल्याने रगडेने दरवाजावर जोरदार धडका दिल्या आणि रागाच्या भरात खिडकीच्या काचा फोडल्या. खिडकीतून आत सपना आणि गौरव राऊत एकत्र दिसल्याने संतापलेल्या रगडेने आत घुसण्याचा प्रयत्न केला. अजनी ते बेलतरोडीच्या हद्दीत थरार परिस्थिती हाताबाहेर गेल्याचे पाहून गौरव राऊतने घरातून बाहेर पडून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, गौरव रगडेने त्याला गाठले. त्यानंतर दोघांमध्ये रस्त्यावरच तब्बल अर्धा तास तुफान हाणामारी सुरू होती. अजनी पोलिस ठाण्याच्या हद्दीतून मारामारी करत दोघेही बेलतरोडी पोलिसांच्या हद्दीत पोहोचले. दोघेही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. याच दरम्यान गौरव राऊतने आपल्या कमरेच्या बेल्टजवळ लपवून ठेवलेला चाकू काढून गौरव रगडेच्या छातीत खोलवर खुपसला, तसेच कुऱ्हाडीनेही वार केले. घटनास्थळी पोलिस दाखल झाले तेव्हा रगडे रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. पोलिसांनी तातडीने गौरव राऊतला ताब्यात घेऊन रगडेला रुग्णालयात हलवले; मात्र डॉक्टरांनी त्याला उपचारापूर्वीच मृत घोषित केले. मृत गौरववर हत्येसह अनेक गंभीर गुन्हे मयत गौरव रगडे हा नागपुरातील कुख्यात गुन्हेगार होता. अजनी पोलिस ठाण्यात त्याच्याविरुद्ध हत्या, हत्येचा प्रयत्न, दरोडा यासह सुमारे नऊ गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांच्या या रक्ताळलेल्या संघर्षाने परिसरात मोठी घबराट पसरली असून पोलिस पुढील तपास करत आहेत.

हे ही वृत्त वाचा

राज्यात मान्सूनची विश्रांती!:पुढील 4-5 दिवस कोणत्याही जिल्ह्याला अलर्ट नाही; कोकणातही पावसाचा जोर ओसरला
महाराष्ट्रातील हवामानात पुन्हा एकदा मोठा बदल पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्याला झोडपून काढणाऱ्या पावसाचा जोर आता ओसरला असून, पुढील चार ते पाच दिवस राज्यातील कोणत्याही जिल्ह्याला जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलेला नाही. सर्वसामान्यांना मुसळधार पावसापासून दिलासा मिळाला असला, तरी ऐन मोक्याच्या वेळी पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत मात्र भर पडली आहे. वाचा सविस्तर



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *