Headlines

एक्सपोज:अठरा कोटींचे रुग्णालय दोन वर्षांपासून धूळखात, आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या दौऱ्याकडे लक्ष




विभागीय संदर्भ रुग्णालयाच्या आवारातच १८ कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेले १०५ खाटांचे अद्ययावत रुग्णालय गेल्या दोन वर्षांपासून धूळखात पडून आहे. इमारत पूर्णत्वाचा दाखला घेताना याठिकाणी आवश्यक फायर सेफ्टीची स्वतंत्र पाण्याची टाकीच बांधण्यात आली नसल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली. त्यानंतर दोन वर्ष उलटून गेली तरी ती इमारत रुग्णांसाठी सुरू झालेली नाही. नाशिकच्या दौऱ्यावर असलेले आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर आज या इमारतीशेजारी आराेग्यसेवेचा आढावा घेणार आहेत. त्याच ठिकाणी बेशुद्धावस्थेत असलेली त्यांच्याच विभागाची इमारत या दौऱ्याकडे आशेने बघत आहे. प्रशासनाच्या या अक्षम्य चुकीमुळे शहर व जिल्ह्यातील सुमारे ४ हजार गरजू रुग्णांना उपचारांपासून वंचित राहावे लागले आहे. परिणामी, येथे उभारलेल्या प्लास्टिक सर्जरी, फिजिओथेरपी, न्यूरो सर्जरी आणि बालरोग या सेवांना रुग्णांना वंचित रहावे लागले आहे. इतर प्रकल्प‘व्हेंटिलेटर’वर ही एकच इमारत नव्हे, तर जिल्हा रुग्णालय आवारात माता व बाल संगोपन व क्रिटिकल केअर युनिटच्या दोन इमारतीही कार्यान्वित झालेल्या नाहीत. बांधकाम विभागाकडून ताबा न मिळाल्याने विलंब अग्निसुरक्षेसाठी ५० लाख लिटरचा जलकुंभ नसल्याची बाब समोर आली. त्यानंतर हे काम हाती घेतले असून, बांधकाम विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र मिळाल्यानंतर आरोग्य विभाग या इमारतीचा ताबा घेईल. – डॉ. कपिल आहेर, आरोग्य उपसंचालक दिव्य मराठी इनसाइड स्टोरी: निवडणुकीपूर्वी उद‌्घाटनाचा घाट अन‌् जलकुंभ गायब सन २०२४ च्या विधानसभा निवडणुकीच्या ताेंडावरच तत्कालीन आराेग्यमंत्र्यांच्या उपस्थितीत या इमारतीच्या उद‌्घाटनाचा घाट घातला जात हाेता. मात्र, त्याचवेळी सार्वजनिक बांधकाम विभागाने फायर सेफ्टी जलकुंभच बांधले नसल्याचे उघड झाले. अखेरीस ते उद‌्घाटन रद्द करण्यात आले हाेते. सत्ता स्थापनेनंतर दुसरे आराेग्यमंत्री आले. दाेन वर्षानंतर याच ठिकाणी त्यांचा दाैरा हाेत आहे, मात्र ही टाकी अजूनही बांधण्यात आलेली नाही.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *