![]()
पंचवटीत अभियंता तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून अत्याचार केल्याचे तसेच तिच्या गळ्यातील तुळशीची माळ तोडून टाकत धर्मांतरासाठी दबाव टाकल्याचे प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणी अटक केलेल्या तांजिर इनामदारची २२ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. पीडितेची २०२४ मध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण घेताना तांजिरशी ओळख झाली. त्याने लॉजमध्ये दारू पाजून अत्याचार केला. गजवा-ए-हिंद करायचे म्हणत तिला धर्मांतरासाठी धमकावले. कॉर्पोरेट जिहाद : राष्ट्रीय महिला आयोगाकडून चौकशी नाशिक येथे टीसीएस कंपनीत धर्मांतर, महिला कर्मचाऱ्यांवर लैंगिक अत्याचाराच्या चौकशीसाठी राष्ट्रीय महिला आयोगाची ३ सदस्यीय समिती शनिवारी नाशिकमध्ये दाखल झाली. समितीने एका पीडितेसह तिच्या कुटुंबीयांशी डिजिटल माध्यमांद्वारे संवाद साधला. ही समिती २० एप्रिलपर्यंत नाशिकमध्ये थांबून चौकशी करेल. दरम्यान, कोर्टाने आरोपी रझा रफिक मेमन, शफी भिकन शेखला २० पर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
Source link
तरुणीवर अत्याचार; धर्मांतरासाठीही दबाव:तरुणीची तुळशीची माळ तोडली, गजवा-ए-हिंदची धमकी