Headlines

छत्रपती संभाजीनगरातील खवड्या डोंगर प्रकरण:आयफोनचा वाद नव्हे, कौटुंबिक तणावातून संपूर्ण कुटुंबाचा दुर्दैवी अंत




तिसगाव परिसरातील खवड्या डोंगर प्रकरणातील चांदगुडे परिवाराचा दुर्दैवी अंत झाला. यात कुणाल व मुरलीधर यांचा पडतानाचा स्पष्ट व्हिडिओ यापूर्वीच समोर आला होता, तर काही वेळाने संगीता खाली पडल्याचे समोर आले होते. मात्र तसा पुरावा समोर आला नव्हता. आता समाज माध्यमांवर नवा व्हिडिओ समोर आला आहे. यात संगीता ह्या खाली पडताना दिसत आहेत. या व्हिडिओमुळे त्या खाली बघताना घसरल्या की त्यांनी उडी घेतली ही चर्चा सुरू आहे. तर दुसरीकडे मुलगा कुणालने आयफोनसाठी आत्महत्या केल्याची चर्चा सुरुवातीला रंगली होती; मात्र, कुणालची मावशी पल्लवी यांनी हा दावा फेटाळून लावला आहे. त्या म्हणाल्या की, ही घटना मोबाईल फोनशी संबंधित नव्हती. लोकांनी अशा अफवा पसरवू नयेत. मूळ परिस्थितीबाबत लोकांना कोणतीही खरी माहिती नाही. मिळालेल्या माहितीनुसार आई-वडिलांनी पुन्हा एकत्र राहावे अशी कुणालची इच्छा होती. मात्र, त्यांच्यात अधिकृत घटस्फोट झाला होता की नाही, याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही. दुसरीकडे, पोलिस उपायुक्त पंकज अतुलकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, या कुटुंबात गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून तीव्र वाद सुरू होते, ज्यामुळे घरात मोठ्या प्रमाणावर मानसिक तणाव निर्माण झाला होता. दरम्यान, एमआयडीसी वाळूज पोलिसांच्या पथकाने अंबड तालुक्यातील धनगर पिंपळगाव येथे जाऊन मुरलीधर यांच्या आई, वडील व तीन बहिणी अशा पाच जणांचे जबाब नोंदवले आहेत. भाऊ काही महिन्यांपूर्वीच पुन्हा बोलू लागला होता. त्यामुळे फारशी माहिती नाही. त्यांच्यात काही अंतर्गत वाद असू शकतो. आता तिघेही जगात नसल्याने आम्हाला कुणावरही आरोप करायचे नाहीत. कुटुंब गमावल्याचे दुःख मोठे आहे, असे त्यांनी पोलिसांना सांगितले. दरम्यान, संगीता यांच्या माहेरच्या नातेवाइकांनाही पोलिसांनी जबाबासाठी पाचारण केले आहे. कुणालने मृत्यूपूर्वी लिहिले, ‘सॉरी एव्हरीवन’ मृत्यूपूर्वी कुणालने सोशल मीडियावर “सॉरी एव्हरीवन’ असे स्टेटस ठेवल्याचे मित्रांनी सांगितले. दरम्यान, घटनेपूर्वी कुणाल दुकानात सामान नेण्यासाठी आला होता. तेव्हा तो शांत दिसत होता. तो असे टोकाचे पाऊल उचलेल असे वाटले नव्हते, अशी माहिती एका दुकानदाराने दिली. योग्य वेळी उत्तर देऊ- बहिणीचा दावा संगीता यांच्या बहिणीने सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करत, “आम्हाला आधी या दुःखातून सावरू द्या. योग्य वेळी ही घटना कशी घडली याचे उत्तर सर्वांना मिळेल,” असे आवाहन केले आहे. महिनाभरापासून मुरलीधर घराबाहेर वाढलेल्या वादानंतर मुरलीधर महिनाभरापासून पत्नीसोबत राहत नव्हते. तरीही कुणालच्या ट्यूशनचा खर्च, मोबाइल व घरभाड्याची जबाबदारी त्यांच्यावरच होती. काही दिवसांपूर्वी कर्जमाफीच्या कामासाठी ते गावी आले तेव्हा त्यांनी बायको-मुलाने शिवीगाळ करून मला घराबाहेर काढले आहे, असे बहिणीला सांगितले होते. लग्नाला गेल्याने वाद 4 महिन्यांपूर्वी एका भाच्याच्या लग्नाला मुरलीधर आले, मात्र संगीता आल्या नाहीत. लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी मधल्या बहिणीच्या मुलाचे निधन झाले. त्यामुळे मुरलीधर तेथे 10 दिवस थांबले. हे संगीताला खटकले. त्यातून वाद झाला. शिवीगाळ करत मुरलीधर यांना घराबाहेर काढल्याचा आरोप शोभा यांनी केला आहे. 80 वर्षांची आई अद्यापही सुन्न मुरलीधर हे 85 वर्षांचे वडील आणि 80 वर्षांच्या आईचा एकुलता आधार होते. ‘तू काही करू नको, आम्ही आई-बापाचे बघून घेऊ, फक्त बोलत जा,’ अशी विनंती बहिणींनी केली होती. अबोल मुलगा गेल्याने वृद्ध आईला शोक अनावर झाला आहे. गावावरही शोककळा आहे. प्रेमविवाहानंतर दुरावा मुरलीधर हे आई-वडिलांचे एकुलते एक होते. त्यांचा संगीतासोबत प्रेमविवाह झाला. संगीता शेतीची कामे करणार नाही म्हणून घरच्यांचा या लग्नाला विरोध होता. मोठ्या मुलाच्या मृत्यूनंतर हे जोडपे संभाजीनगरला आले. 17-18 वर्षांपासून मुरलीधर यांचा आई-वडील व बहिणींशी संपर्क नव्हता. शैलेश माने यांनी स्वीकारले शेरू श्वानाचे पालकत्व प्राणिमित्र शैलेश माने यांनी चांदगुडे यांच्या ‘शेरू’ नावाच्या कुत्र्याचे पालकत्व स्वीकारले. त्यांच्याकडे आधीच अपघातग्रस्त 10-12 कुत्रे आहेत. त्यांच्यासोबत शेरू खेळला असून तो जेवल्याचे त्यांनी सांगितले. मीडियावर व्हिडिओ व्हायरल संगीता यांच्या बहिणीकडून कुटुंबाची बदनामी न करण्याचे आवाहन करणारे व्हिडिओ टाकण्यात येत आहेत. या घटनेचे दुसरे कारण लवकरच समोर येईल, असा व्हिडिओ संगिता यांच्या बहिणीने पोस्ट केला. अपघाताच्या एक दिवस आधी यूट्यूबवर नात्यांबद्दल केला होता व्हिडिओ पोस्ट 21 ऑगस्ट रोजी कुणालसोबत जीव गमावलेल्या त्याच्या आई संगीता चांदगुडे यांनी अपघाताच्या एक दिवस आधी आपल्या यूट्यूब चॅनलवर नात्यांचे आणि प्रेमाचे महत्त्व यावर एक व्हिडिओ पोस्ट केला होता. यात त्यांनी म्हटले होते- जो व्यक्ती प्रेमाला महत्त्व देत नाही, त्याच्यासाठी काहीही करण्यात अर्थ नाही. कुणालच्या कुटुंबातील वादाशी संबंधित 2 दावे… संगीताच्या माहेरच्या मंडळींनुसार मुरलीधर आणि संगीता यांच्यात बऱ्याच काळापासून वाद सुरू होता. यात मालमत्तेशी संबंधित वादही समाविष्ट होते. कुणालला वाटत होते की दोघांमधील मतभेद संपले पाहिजेत. वडिलांच्या कुटुंबाने वेगळीच कहाणी सांगितली मुरलीधरची बहीण शोभा राजेंद्र मस्के यांनी पती-पत्नीच्या नात्याबद्दल वेगळी माहिती दिली. त्यांच्या मते, मुरलीधर आणि संगीताने सुमारे 22 वर्षांपूर्वी प्रेमविवाह केला होता. मुरलीधरचे आई-वडील या लग्नाच्या विरोधात होते आणि लग्नात सहभागीही झाले नव्हते. शोभाला तिच्या सासरच्यांनी कधीच स्वीकारले नाही. अपघाताच्या दिवसाचा घटनाक्रम, 3 फोटोंमध्ये समजून घ्या… कुणाल 4 तास डोंगराच्या कडेला उभा होता वडील वाचवण्यासाठी पुढे सरसावले, दोघेही खाली पडले काही सेकंदांनंतर आईही डोंगरावरून उडी मारली



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *