![]()
आज जगप्रसिद्ध वेरूळ येथे वेरूळ लेणी परिसरात जागतिक वारसा दिनाचे (World Heritage Day) औचित्य साधून जगप्रसिद्ध वेरूळ लेणी येथे पर्यटकांचा मोठा उत्साह पाहायला मिळाला. या खास प्रसंगी अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी वेरूळ लेणीला भेट देऊन भार
.
मुख्यमंत्र्यांकडून कैलास लेण्याचे कौतुक
मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी शनिवारी वेरूळ लेणीला भेट दिली. यावेळी त्यांनी विशेषतः १६ क्रमांकाच्या ‘कैलास लेण्या’ची पाहणी केली. एकाच अखंड पाषाणात कोरलेल्या या भव्य मंदिराचे सौंदर्य पाहून त्यांनी भारतीय कारागिरांच्या कौशल्याबद्दल अभिमान व्यक्त केला. भारतीय संस्कृती आणि इतिहासाचा हा वारसा थक्क करणारा असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.
६ हजार पर्यटकांनी लुटला मोफत प्रवेशाचा आनंद
भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागातर्फे (ASI) दरवर्षी १८ एप्रिल रोजी जागतिक वारसा दिनानिमित्त ऐतिहासिक वास्तूंमध्ये पर्यटकांना मोफत प्रवेश दिला जातो. या सवलतीचा फायदा घेत सकाळपासूनच वेरूळ परिसरात पर्यटकांची मोठी गर्दी झाली होती. वेरूळ लेणीचे मुख्य अधिकारी निलेश कोळी यांनी दिलेल्या माहितीनुसार, “दिवसभरात ५.५ ते ६ हजार पर्यटकांनी लेणीला भेट दिली. पर्यटकांच्या सुविधेसाठी प्रशासनातर्फे विशेष व्यवस्था करण्यात आली होती.” अशी माहिती वेरूळ लेणी प्रमुख निलेश कोळी यांनी दिली.
शालेय विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा
वारसा दिनाचे महत्त्व तरुण पिढीला समजावे, या उद्देशाने छत्रपती संभाजीनगर येथील पी. यु. जैन विद्यालय आणि वेरूळ लेणी प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदवत ऐतिहासिक वारशाचे संवर्धन या विषयावर आपले विचार मांडले.
हर्ष कोपरेकर ठरला विजेता
या निबंध स्पर्धेतून एकूण पाच उत्कृष्ट विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. यामध्ये हर्ष कोपरेकर याने प्रथम क्रमांक पटकावून बाजी मारली. विजेत्या विद्यार्थ्यांचे अधिकारी निलेश कोळी आणि शाळा प्रशासनाकडून कौतुक करण्यात आले. आपल्या ऐतिहासिक वास्तूंचे जतन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे संदेश या उपक्रमातून देण्यात आला. एकीकडे मुख्यमंत्र्यांसारख्या अतिमहत्त्वाच्या व्यक्तीची भेट आणि दुसरीकडे हजारो पर्यटकांचा उत्साह, यामुळे यंदाचा जागतिक वारसा दिन वेरूळ लेणीमध्ये मोठ्या दिमाखात साजरा झाला.