![]()
खोलेश्वर चौक ते नगरपंचायत मार्गावरील वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या फळांच्या हातगाड्यांवर नेवासा नगरपंचायतीने गुरुवारी अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केली. नगरपंचायतीचे अधिकारी सागर झावरे यांनी ध्वनिक्षेपकावरून हातगाड्या हटवण्याचे आवाहन केले. मात्र, विक्रेत्यांन
.
पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांच्यासह पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करून जमावाला पांगवले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. शेटे यांच्या वाहनाचा पाठलाग करून पावन गणपती मंदिराजवळ पुन्हा वाहन अडवून शिवीगाळ केल्याची माहिती समोर आली. घटनेनंतर शहरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी नेवाशात दाखल होत परिस्थितीचा आढावा घेतला. कायदा हातात घेणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी दिला. शहरात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी दोन दिवसांसाठी जमावबंदी लागू करण्यात आली आहे.
नेवासे शहरातील वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या हातगाड्यांवर कारवाई करण्यासाठी ऋषिकेश शेटे यांनीही यापूर्वी नगरपंचायतीकडे अर्ज दिला होता. याच मागणीवरून सुरू झालेल्या कारवाईदरम्यान त्यांच्याच वाहनाची तोडफोड झाल्याने घटनेला वेगळे वळण मिळाले.
शेटेंविरुद्ध यापूर्वी गुन्हा ऋषिकेश शेटे यांनी सोशल मीडियावर कथित वादग्रस्त टिप्पणी केल्याप्रकरणी यापूर्वी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात त्यांना अटक होऊन पोलिस कोठडी मिळाली होती. त्यानंतर न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला होता.