![]()
सिल्लोड सण-उत्सवाच्या काळातही प्रवाशांच्या सेवेसाठी तत्पर असणाऱ्या एसटी महामंडळाच्या चालक, वाहक आणि कर्मचाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी छत्रपती शिवाजी विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी सिल्लोड आगारातील चालक, वाहक व मेकॅनिक बांधवांना राखी बांधून रक्षाबंधन साजरे केले. या वेळी आगारप्रमुख सागरकुमार कुरील, वाहतूक निरीक्षक सतीश अंभोरे, मुख्य कारागीर हरिओम शेळके, सोमेश सपकाळ, शिक्षिका संगीता तायडे, संगीता काळे, नम्रता वडमारे, गणेश चव्हाण आणि गजानन दौड आदी उपस्थित होते. सतीश अंभोरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या उपक्रमाचे औचित्य साधून वाहक संदीप इंगळे यांनी विद्यार्थिनींना विज्ञानातील मूलद्रव्ये, गणितातील वर्ग आणि पाढ्यांचे तक्ते (चार्ट) भेट देऊन मार्गदर्शन केले. सिल्लोड आगारातील कर्मचाऱ्यांना राखी बांधताना विद्यार्थिनी.
Source link
सिल्लोड:एसटी कर्मचाऱ्यांना विद्यार्थिनींनी बांधली राखी