Headlines

पैठण नगर परिषदेत अखेर स्वीकृत नगरसेवकाची निवड:राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जितू परदेशी बिनविरोध




पैठण नगर परिषदेत गेल्या 8 महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या स्वीकृत नगरसेवक निवडीला अखेर सोमवारी मुहूर्त मिळाला. विशेष सभेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शहराध्यक्ष जितू परदेशी यांची स्वीकृत नगरसेवक म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली. नगराध्यक्ष विद्या भूषण कावसानकर आणि मुख्याधिकारी डॉ. पल्लवी अंभोरे यांच्या अध्यक्षतेखाली ही विशेष सभा पार पडली. यावेळी नगर परिषदेतील सर्व नगरसेवक उपस्थित होते. पैठण नगर परिषदेत एकूण 25 नगरसेवक असून, त्यात शिवसेना शिंदे गटाचे 17, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 2, काँग्रेसचे 4, तर भाजप आणि शिवसेना ठाकरे गटाचा प्रत्येकी 1 नगरसेवक आहे. नगर परिषद निवडणुकीदरम्यान शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये राजकीय तडजोडीमध्ये राष्ट्रवादीला 1 स्वीकृत नगरसेवकपद देण्याचा शब्द शिवसेनेकडून देण्यात आला होता. आठ महिन्यांच्या प्रतीक्षेला पूर्णविराम नगर परिषदेत एकूण तीन स्वीकृत नगरसेवक निवडण्याची तरतूद आहे. मात्र, सोमवारी झालेल्या सभेमध्ये केवळ राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या एकाच सदस्याची निवड करण्यात आली. शिवसेना शिंदे गटाच्या उर्वरित दोन स्वीकृत सदस्यांची निवड पुढील टप्प्यात केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. दिलेला शब्द पाळला- नगरसेवक बजरंग लिंबोरे नगरसेवक बजरंग लिंबोरे म्हणाले की, नगर परिषद निवडणुकीच्या वेळी खासदार संदिपान भुमरे आणि आमदार विलास भुमरे यांनी अजित पवार गटाला स्वीकृत नगरसेवक देण्याचा शब्द दिला होता. तो शब्द त्यांनी आज तंतोतंत पाळला आहे. पक्षाचे शहराध्यक्ष जितू परदेशी यांच्या निवडीमुळे नगर परिषदेत राष्ट्रवादीचा आवाज अधिक बुलंद होईल.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *