Headlines

साताऱ्यात कौटुंबिक वादातून पतीने केला पत्नीचा खून:पसार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला बेड्या




सातारा शहरालगतच्या बोगदा परिसरात कौटुंबिक वादातून पतीने पत्नीवर प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना रविवारी मध्यरात्री घडली. या हल्ल्यात सुनिता प्रदीप चव्हाण (वय ३५) यांचा मृत्यू झाला. घटनेनंतर पसार होण्याच्या तयारीत असलेल्या पतीला शाहूपुरी पोलिसांनी काही तासांतच ताब्यात घेतले. पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, चव्हाण दाम्पत्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून कौटुंबिक कारणावरून वाद सुरू होता. रविवारी रात्री अडीचच्या सुमारास पुन्हा दोघांमध्ये वाद झाला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाल्यानंतर प्रदीप हणमंत चव्हाण याने पत्नी सुनिता यांच्यावर हल्ला केला. गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच शाहूपुरी पोलीस ठाण्याचे अधिकारी व डी.बी. पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा व घटनास्थळाची पाहणी करून आरोपीचा शोध सुरू केला. दरम्यान, घटनास्थळावरून पसार होण्याच्या तयारीत असलेल्या प्रदीप चव्हाण याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याला अटक करण्यात आली असून, खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया करण्यात आली आहे. खुनामागे कौटुंबिक वाद हे प्राथमिक कारण असल्याचे समोर आले असले, तरी हत्येमागे अन्य काही कारण आहे का, याचा तपास शाहूपुरी पोलीस करीत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *