Headlines

खंडाळ्यात पावसाचा मोठा खंड; खरिपाची पिके करपू लागली:पाच दिवसांत पाऊस न आल्यास पिके सुकणार; शेतकरी आर्थिक संकटात‎




वैजापूर तालुक्यातील खंडाळा व परिसरातील गावांमध्ये गेल्या २० ते २२ दिवसांपासून पावसाने अचानक मोठा खंड दिल्याने खरीप हंगाम धोक्यात आला आहे सुरुवातीला समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद होता, मात्र आता ऐन वाढीच्या आणि फुलोऱ्याच्या अवस्थेत पावसाने पाठ फिरवल्याने पिके माना टाकू लागली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत मोठी वाढ झाली आहे. यंदा मान्सून वेळेवर दाखल झाला नाही त्यामुळे महिनाभर उशिराने खरीप पेरण्या झाल्या असल्या तरी खंडाळा, बोरसर,पानगव्हाण, जानेफळ परिसरातील शेतकऱ्यांनी मोठ्या खरीप पेरण्या केल्या होत्या. परिसरात प्रामुख्याने मका, बाजरी, सोयाबीन, कापूस, मूग आणि तुर या पिकांची लागवड मोठ्या प्रमाणावर करण्यात आली आहे. जवळपास ९० टक्के पेरण्या पूर्ण झाल्या होत्या आणि पिके चांगली बहरली होती. परंतु, ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यानंतर पावसाने उघडीप दिली आहे. गेल्या तीन आठवड्यांपासून एकही जोरदार पाऊस झालेला नाही. परिणामी शेतातील ओलावा पूर्णपणे संपला आहे. मका पिकाचे कणीस भरण्याच्या अवस्थेत असताना पाण्याअभावी पाने पिवळी पडून वाळू लागली आहेत. सोयाबीन पिकाची वाढ खुंटली असून फुले गळू लागली आहेत. कापसाची पाती, बोंडे गळण्याचे प्रमाण वाढले आहे. विहिरी आणि प्रकल्पाची पाणीपातळीही झपाट्याने खालावली आहे.खत, बियाणे, औषधांसाठी सावकार आणि बँकेकडून कर्ज काढलेल्या शेतकऱ्यांवर दुहेरी संकट ओढवले आहे पेरणीसाठी एकरी ५० ते ६० हजार रुपये खर्च आला. आता पीक हातचे जाण्याची वेळ आली आहे. ढगाळ वातावरणामुळे पिकांवर लष्करी अळी आणि मर रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. नदी-नालेही कोरडे पडले आहेत. पाणीटंचाईची चिंता आहे. शेतकरी दुहेरी संकटात सापडला, मदत द्यावी खत, बियाणे, औषधांसाठी सावकार आणि बँकेकडून कर्ज काढलेल्या शेतकऱ्यांवर दुहेरी संकट ओढवले आहे पेरणीसाठी एकरी ५० ते ६० हजार रुपये खर्च आला. आता पीक हातचे जाण्याची वेळ आली आहे. ढगाळ वातावरणामुळे पिकांवर लष्करी अळी आणि मर रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. चार ते पाच दिवसांत जोरदार पाऊस झाला नाही, तर खंडाळा परिसरातील संपूर्ण खरीप हंगाम वाया जाण्याची भीती.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *