Headlines

चंद्रेश्वर महादेवास दुग्धाभिषेक आणि चंदनाचा साजशृंगार:दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांची गर्दी, मंदिर परिसरात फळे वाटप, ‘ॐ नम: शिवाय’चा जयघोष‎



तिसऱ्या श्रावणी सोमवारनिमित्त येथील पुरातन चंद्रेश्वर गडावरील चंद्रेश्वर महादेव मंदिरात सोमवारी (दि. ३१) भगवान चंद्रेश्वरच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. दिवसभरात हजारो भाविकांनी चंद्रेश्वर महादेवाचे दर्शन व चंद्रेश्वर गडाचे महंत स्वाम

.

श्रावणी सोमवारनिमित्त सोमवारी (दि. ३१) पहाटे साडेचार वाजता चंद्रेश्वर गडाचे महंत स्वामी जयदेवपुरीजी महाराज यांच्या हस्ते भगवान चंद्रेश्वराच्या पिंडीवर दुग्धाभिषेक करुन विधीवत पूजन करण्यात आले व त्यानंतर आरती करण्यात आली. श्रावणातील शिवामूठ म्हणून मुगाचे वाण वाहण्यात आले. सकाळपासून भाविकांनी दर्शनासाठी मोठ्या रांगा लावल्या होत्या. यावेळी ‘ॐ नम: शिवाय’, ‘चंद्रेश्वर महादेव की जय’च्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता. भाविकांनी चंद्रेश्वर गडाचे महंत स्वामी जयदेवपुरीजी महाराज यांचेही आशीर्वाद घेतले. तसेच यावेळी भाविकांकडून फळे वाटपही करण्यात आले. दरम्यान, श्रावणी सोमवारनिमित्त रविवारी सायंकाळी सांज आरतीला शिवपिंडीवर आकर्षक साजशृंगार करण्यात आला होता. यावेळी चंदनाच्या उटीने शंकराचा मुखवटा तयार करुन फुलांची आकर्षक आरास करण्यात आली होती. त्यानंतर मनोभावे सायंकाळी सांजआरती करण्यात आली. यावेळी अनेक भाविक, भक्त व चंद्रेश्वर भक्त मंडळाचे सदस्य उपस्थित होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *