Headlines

ढाल-तलवारीचे युद्ध संपले, आता बुद्धीच्या बळावर लढण्याची गरज:सटाणा येथे सांगता समारंभात कवी जगताप यांनी व्यक्त केले विचार‎



मराठ्यांनी अटकेपार झेंडे लावले; ढाल-तलवारीचे युद्ध संपले असून, आता बुद्धीच्या बळावर लढण्याची गरज आहे. आजच्या काळात अज्ञानाला थारा राहिलेला नाही. माणसाचे डोके कायम ज्ञानाने भरलेले असावे आणि त्याची ज्ञानाची भूक भागावी, यासाठी व्याख्यानमालांचे आयोजन आवश

.

सटाणा येथे सहकारमहर्षी स्व. दादासाहेब उर्फ वसंतराव दगाजी पाटील यांच्या पुण्यस्मरणार्थ २१ व्या वसंत व्याख्यानमालेच्या सांगता समारंभात ‘कवितेतून समाजप्रबोधन’ या विषयावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कोपरगाव येथील गोदावरी दूध संघाचे चेअरमन राजेश परजणे होते.

मराठी भाषेच्या जतनाबाबत जगताप यांनी मराठी भाषेची उपेक्षा करून मराठी भाषा शिकवता येणार नाही. त्यासाठी मराठी माणूसच मोठा झाला पाहिजे. कवितेच्या माध्यमातून विविध सामाजिक विषयांवर भाष्य करत त्यांनी मुलींनी विवाहाबाबत अवास्तव अपेक्षा न ठेवता शेतीत कष्ट करणाऱ्या तरुणांकडेही जीवनसाथी म्हणून पाहावे, असा संदेश दिला. संस्कारांतून व्यक्तिमत्त्व घडते: पहिल्या पुष्पात सेवानिवृत्त आयपीएस अधिकारी डॉ. सुनील कडासने यांनी ‘जीवनातील संस्कारांचे महत्त्व’ या विषयावर मार्गदर्शन केले. जीवनात यशस्वी होण्यासाठी शिक्षण, संपत्ती आणि कौशल्याबरोबरच उत्तम संस्कारांची नितांत गरज आहे. संस्कार ही व्यक्तिमत्त्व घडविणारी प्रक्रिया असून, कुटुंब, समाज आणि शैक्षणिक संस्थांची त्यामध्ये महत्त्वाची भूमिका आहे, असे सांगितले. राजेश परजणे यांनी आई-वडील हेच खरे दैवत आहेत. आई-वडिलांची जाण ठेवणारेच समाजात ताठ मानेने राहू शकतात. दिवंगत वडिलांच्या स्मरणार्थ २१ वर्षांपासून पाटील कुटुंबीय व्याख्यानमालेच्या माध्यमातून समाज घडविण्याचे कार्य करीत असल्याचे त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाचे आयोजक डॉ. संजय पाटील यांनी प्रास्ताविकातून पाटील कुटुंबियांच्या तीन पिढ्यांच्या समाजकार्याचा आढावा घेतला. उपस्थितांचे स्वागत व आभार डॉ. चंद्रसेन पाटील यांनी मानले. सूत्रसंचालन प्रा. जितेंद्र मेतकर यांनी केले. कार्यक्रमास नगराध्यक्ष हर्षदा पाटील, माजी आमदार संजय चव्हाण, प्राचार्य दिलीप शिंदे, शेतकरी संघाचे अध्यक्ष प्रल्हाद पाटील, प्राचार्य हितेंद्र आहेर, डॉ. कल्याणराव भोसले, कुमुदिनी भोसले, इंजि. श्यामकांत मराठे आदी उपस्थित होते.

गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव तालुक्यातील दहावी व बारावी परीक्षेत प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा त्यांच्या पालकांसह सन्मान करण्यात आला. वसंत व्याख्यानमालेच्या माध्यमातून दरवर्षी गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव केला जातो. व आई-वडिलांची निःस्वार्थ सेवा करणाऱ्या व्यक्तीला ‘श्रावणबाळ पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्याची परंपरा आहे.

‘माणूस कृषी केंद्र’ चळवळीचे प्रणेते जोशी यांना वसंत गौरव शहापूर येथील ‘माणूस कृषी केंद्र’ चळवळीचे प्रणेते व्यंकटेश जोशी यांना यंदाचा ‘वसंत गौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. सामाजिक कार्यासोबतच नैसर्गिक व विषमुक्त शेतीचे प्रयोग, गोसंवर्धन, जैविक शेती तसेच गरजू कुटुंबांना मदत करण्याचे कार्य ‘मानस’ संस्थेच्या माध्यमातून केले जाते. शहापूरजवळील साजिवली येथे सुमारे २५० एकर क्षेत्रात सजीव शेतीचे प्रयोग राबविले जात असून, देशभरातील शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीचे प्रशिक्षण दिले जाते. संस्थेच्या माध्यमातून गरीब व गरजू कुटुंबांना मदत तसेच आदिवासी पाड्यांवरील कुपोषित बालकांच्या कुटुंबांना धान्य वाटप केले जाते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *