![]()
पारनेर शहरातून जाणाऱ्या रस्ता रुंदीकरणाच्या मुद्द्याने सोमवारी अचानक गंभीर वळण घेतले. रुंदीकरणामुळे बाधित होणाऱ्या मालमत्ताधारकांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी आयोजित बैठकीत झालेल्या वादाचे पर्यवसान माजी नगराध्यक्ष विजय औटी यांना मारहाणीत झाले. या घटनेनंतर शहरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. मारहाणीच्या निषेधार्थ औटी समर्थक, बाधित मालमत्ताधारक व ग्रामस्थांनी खालच्या वेशीजवळ रास्ता रोको आंदोलन केले. व्यापाऱ्यांनीही बंद पाळला. यासंदर्भात माजी नगराध्यक्ष औटी यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, सोमवारी सकाळी पारनेर शहरातील रस्ता रुंदीकरणाबाबत चर्चा करण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत आपला व तुषार औटी यांच्यात वाद झाला.बैठकीतून बाहेर आल्यानंतर गळा दाबून मारहाण करण्यात आली.यावेळी आपणास जिवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले आहे. मात्र,रात्री उशिरापर्यंत दोन्ही गटात समेटाचे प्रयत्न सुरू होते देवीभोयरे फाटा ते खडकी (नगर) या ४९ किलोमीटर रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. पारनेर शहरातील रस्ता २२ मीटर रुंदीचा करण्याची मागणी ग्रामस्थांची आहे. यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात बैठक होणार होती. त्यापूर्वी बाधित मालमत्ताधारकांचे म्हणणे जाणून घेण्यासाठी बाजार समितीच्या सभागृहात बैठक घेण्यात आली. यावेळी रुंदीकरण समर्थक, बाधित मालमत्ताधारक, नगरसेवक व विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. मारहाणीची माहिती मिळताच औटी औटी समर्थकांसह आंदोलकांनी खालच्या वेशीजवळ रास्ता रोको सुरू केला. पोलिस निरीक्षक सोमनाथ दिवटे यांनी आंदोलकांशी चर्चा केल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. उशिरापर्यंत समेटाचे प्रयत्न ^ गुन्हा दाखल झाला असला तरी समेटाचे प्रयत्न अद्याप सुरू आहेत.दोन्ही गटात समझोता झाला तर नियमाप्रमाणे गुन्ह्याचा तपास बंद करण्यात येईल.सार्वजनिक कामाच्या वादातून वाद झाला आहे.त्यामुळे समझोता झाला तर ते पारनेर शहरातील चांगल्या वातावरणासाठी योग्य राहील. सोमनाथ दिवटे, पोलिस निरीक्षक,पारनेर.
Source link
रस्ता रुंदीकरणावरून पारनेरमध्ये ‘राडा’:माजी नगराध्यक्षांना मारहाण, निषेधार्थ रास्ता रोको अन्शहर बंद, तीन जण ताब्यात