![]()
गटारातून गॅस, ढगांमुळे रडार बंद पडणे आणि खात्यात 15 लाख जमा करण्याचे दावे करणारा भाजपचा पहिला ‘फेकू’ कोण? असा सवाल मनसेचे मुंबई शहराध्यक्ष संदीप देशपांडे यांनी केला आहे. अमित ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो काढण्यास लावल्यानंतर भाजपच्या युवामोर्चाकडून आंदोलनानंतर देशपांडे यांनी ही पोस्ट केली आहे. दरम्यान पुण्यातील शासकीय तंत्रज्ञान महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या सुविधांची पाहणी करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे पोहोचले होते. त्यावेळी मुख्याध्यापकांच्या कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेशेजारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो लावण्यात आल्याचे दिसून आले होते. त्यानंतर मनसैनिकांनी व अमित ठाकरेंनी आक्रमक पवित्रा घेत पंतप्रधान मोदींचा फोटो तिथून काढला. त्यानंतर आता भाजप आणि मनसेमध्ये तणाव निर्माण झाल्याचे दिसत आहे. देशपांडेंची पोस्ट काय? संदीप देशपांडे म्हणाले की, गटारातून गॅस तयार करणारा, ढग असतील तर रडार काम करत नाही हे ज्ञान देणारा, 15 लाख तुमच्या खात्यात जमा करतो हे फेकणारा भाजपचा पहिला ‘फेकू’ कोण?” असा सवाल देशपांडे यांनी केला आहे. देशपांडेंच्या या बोचऱ्या टिकेमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. महाडिकांना पोलिसांनी घेतले ताब्यात अमित ठाकरे यांच्या विरोधात भाजप युवा मोर्चाने त्यांच्या शिवतीर्थ निवासस्थानासमोर आंदोलनाची हाक दिल्यानंतर त्या ठिकाणी मनसैनिक मोठ्या प्रमाणात जमल्याचे दिसून येत आहे. यावेळी मनसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करत भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांना आव्हानही दिले आहे. त्याच वेळी महिममध्ये भाजप युवा मोर्चा अध्यक्ष कृष्णराज महाडिक पोहोचल्यानंतर त्यांनी अमित ठाकरे यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. त्यानंतर मनसैनिकही तिथे पोहोचल्यानंतर गोंधळाची स्थिती निर्माण झाली. त्यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप करत दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना बाजूला करण्याचे काम केले. नेमका वाद कशामुळे पेटला? अमित ठाकरे यांनी पुणे येथील शासकीय तंत्रज्ञान महाविद्यालात जाऊन विद्यार्थ्यांच्या सुविधांची पाहणी केली. मात्र यावेळी मुख्याध्यापकांच्या कार्यालयात गेल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेशेजारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो लावल्याचे दिसून आले. त्यानंतर अमित ठाकरे यांनी यावर आक्षेप घेत तो फोटो तिथून काढण्यास सांगितले. त्यानंतर मनसैनिकांनी आक्रमक पवित्रा घेत तो फोटो तिथून काढला. या प्रकारामुळे भाजप आणि मनसेमध्ये वाद निर्माण झाला आहे. तसेच या प्रकारानंतर अमित ठाकरे आणि मनसेच्या दोन कार्यकर्त्यांवर गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. हे ही वृत्त वाचा महाराष्ट्रात पुन्हा बरसणार पाऊस!:सप्टेंबरच्या पहिल्याच आठवड्यात जोरदार पुनरागमन; विदर्भासह-मराठवाड्यालाही दिलासा, पुढे ऑक्टोबर हीटचा तडाखा
ऑगस्ट महिन्याच्या उत्तरार्धात पावसाने घेतलेल्या विश्रांतीमुळे चिंतेत असलेल्या महाराष्ट्राला सप्टेंबरच्या सुरुवातीलाच दिलासा मिळण्याची शक्यता आहे. राज्यात पुढील काही दिवसांत मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची चिन्हे दिसत असून 3 ते 5 सप्टेंबरदरम्यान अनेक भागांत चांगला पाऊस होण्याचा अंदाज आहे. विशेषतः विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर अधिक राहण्याची शक्यता आहे. वाचा सविस्तर
Source link