Headlines

राहुल गांधी नाशिकमध्ये दाखल, भाजप कार्यकर्त्यांकडून आंदोलन:काँग्रेसच्या शिबिरात ‘कुंग-फू’ प्रात्यक्षिके दाखवणार, आदिवासी विद्यार्थ्यांशी साधणार संवाद




लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी नाशिक दौऱ्यावर आले असून काँग्रेसच्या ‘सृजन शिबिरा’चा समारोप त्यांच्या उपस्थितीत राहणार आहेत. गंगापूर धरण परिसरातील शिबिरात ते 75 जिल्हाध्यक्षांसमोर ट्रेनर रिषभ यांच्यासोबत ‘कुंग-फू’चे प्रात्यक्षिक सादर करणार आहेत. तर दुसरीकडे भाजपकडून राहुल गांधी यांच्याविरोधात निषेध केला आहे. राहुल गांधी यांच्या विरोधात भाजपकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. महिला आरक्षणावर राहुल गांधी यांनी दुटप्पी भूमिका घेतली असल्याने आम्ही त्यांच्याविरोधात आंदोलन करत आहोत, असे आंदोलनकर्त्या महिलांनी माध्यमांशी बोलताना म्हटले आहे. एकीकडे विधेयकाला विर करायचे आणि दुसरीकडे आम्ही महिलांच्या सोबत आहोत असे ते म्हणत आहे. आमचा आवाज त्यांच्यापर्यंत पोहचला पाहिजे, यासाठी आम्ही हे आंदोलन करत आहोत, असे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन करणाऱ्या महिलांनी म्हटले आहे. आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधींशी करणार चर्चा राहुल गांधी आजच्या दौऱ्यात नाशिकमध्ये आंदोलन करणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधींशी बंद दाराआड संवाद साधणार आहेत. पारंपरिक आदिवासी मतदार जोडण्यासाठी ही राजकीय खेळी मानली जात आहे. आंदोलनस्थळी भेटीची मागणी नाशिकमध्ये गेल्या १५ दिवसांपासून आदिवासी विद्यार्थ्यांचे मोठे आंदोलन आणि उलगुलान मोर्चा सुरू आहे. या आंदोलनाने राज्य सरकारची मोठी कोंडी केली असून, हाच धागा पकडून राहुल गांधी राजकीय खेळी करण्याच्या तयारीत आहेत. विद्यार्थ्यांशी केवळ चर्चा न करता राहुल गांधी यांनी प्रत्यक्ष आंदोलनस्थळी येऊन भेट द्यावी, अशी विद्यार्थ्यांची आग्रही मागणी आहे. त्यांनी ही मागणी मान्य केल्यास सरकारसमोरील अडचणी वाढण्याची शक्यता आहे. असे आहे दौऱ्याचे वेळापत्रक हे ही वृत्त वाचा

मनोज जरांगेंच्या उपोषणाचा 5 वा दिवस:जरांगेंची प्रकृती खालावली, पण भूमिकेवर ठाम, अनेक जिल्ह्यात आंदोलनाचे पडसाद

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज 5 वा दिवस आहे. प्रकृती खालावलेली असतानाही जरांगे पाटील आपल्या उपोषणाच्या भूमिकेवर ठाम आहेत. मंगळवारी रात्री जालन्याच्या जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी उपोषणस्थळी भेट देऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. वाचा सविस्तर



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *