Headlines

तांदुळवाडी ते घोडेगाव रस्ता; ग्रामस्थांचे साखळी उपोषण सुरू:1 सप्टेंबरपासून रस्त्यावरच उपोषण, प्रशासनाचे दुर्लक्ष‎




गंगापूर तालुक्यातील तांदुळवाडी ते घोडेगाव आणि डोमेगाव रस्त्याचे तातडीने रुंदीकरण व सिमेंट काँक्रीटीकरण करण्यात यावे, या मागणीसाठी ग्रामस्थांनी १ सप्टेंबरपासून रस्त्यावरच बेमुदत साखळी उपोषण सुरू केले आहे. प्रशासनाला दिलेल्या मुदतीत काहीही हालचाल न झाल्याने संतप्त ग्रामस्थांनी हा पवित्रा घेतला आहे. घोडेगाव ते तांदुळवाडी या ५ किलोमीटर रस्त्याचे डांबरीकरण होऊन तब्बल ३० वर्षे झाली आहेत. सध्या या रस्त्याची पूर्णपणे चाळणी झाली असून गुडघाभर खड्ड्यांमुळे वाहतूक ठप्प झाली आहे. तसेच, डोमेगाव ते घोडेगाव रस्त्याचे काम मागील ३-४ वर्षांपासून अपूर्ण असून रस्ता अत्यंत खराब झाला आहे. याशिवाय घोडेगाव ते कनकोरी, सिध्दनाथ वाडगाव, खादगाव आणि पळसगाव या प्रत्येकी २ किलोमीटरच्या जोड रस्त्यांचे मजबुतीकरण व डांबरीकरण करावे, अशी संपूर्ण परिसरातील ग्रामस्थांची रास्त मागणी आहे. प्रशासनाला ३१ ऑगस्टपर्यंतची मुदत देण्यात आली होती; मात्र दुर्लक्ष झाल्याने ग्रामस्थांनी रस्त्याच्या कडेला मंडप टाकून आंदोलन छेडले आहे. रस्त्यांचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही, असा ठाम निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. प्रशासनाला दिलेल्या मुदतीत काहीही हालचाल न झाल्याने संतप्त ग्रामस्थांनी हा पवित्रा घेतला आहे. दरम्यान, तातडीने हा प्रश्न सोडवण्याची मागणी होत आहे. या साखळी उपोषणात ग्रामस्थांचा मोठ्या संख्येने सहभाग आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *