Headlines

सोयगावात मुख्य रस्त्यांवर पशुधनाचा ठिय्या:अपघातांचे प्रमाण वाढल्याने नागरिक त्रस्त, प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी‎




सोयगाव शहरातील मुख्य रस्त्यांवर फिरणाऱ्या मोकाट जनावरांमुळे वाहतुकीला गंभीर अडथळा निर्माण होत असून, छोटे-मोठे अपघात होण्याचे प्रमाण चिंताजनकरीत्या वाढले आहे. त्यातच शहरात मोकाट कुत्र्यांची संख्याही प्रचंड वाढल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. काही पशुपालकांकडून जनावरे थेट रस्त्यावर सोडून दिली जातात. त्यामुळे अचानक आडव्या येणाऱ्या जनावरांमुळे वाहनचालकांना, विशेषतः दुचाकीस्वारांना मोठी कसरत करावी लागत आहे. नगरपंचायतीने जाहीर प्रगटनाद्वारे अनेकदा आवाहने करूनही परिस्थिती जैसे थे आहे. यावर ठोस कायदेशीर कारवाई होत नसल्याने नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. दुसरीकडे, इतर ठिकाणांहून अज्ञात व्यक्ती कुत्रे आणून शहर परिसरात सोडत असल्याने मोकाट कुत्र्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे नगरपंचायतीने मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा, निष्काळजी पशुपालकांवर दंडात्मक कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *