![]()
पाथर्डी मोबाईल आणि सोशल मीडियाच्या अतिरेकी वापराचा विद्यार्थिनींच्या अभ्यासावर, वेळेच्या नियोजनावर आणि भविष्यातील ध्येयावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे तंत्रज्ञानाचा वापर गरजेपुरताच करून शिक्षण, व्यक्तिमत्त्व विकास आणि उज्ज्वल भविष्यासाठी प्रयत्नांना प्राधान्य द्यावे, असे आवाहन पाथर्डी पोलिस ठाण्याच्या पोलिस उपनिरीक्षक तथा दामिनी पथकाच्या प्रमुख रेवती भोसले यांनी केले. श्री तिलोक जैन उच्च माध्यमिक विद्यालयात इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थिनींसाठी मार्गदर्शनपर संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भोसले यांनी विद्यार्थिनींशी मनमोकळा संवाद साधत सायबर क्राईम, टवाळखोर मुलांपासून सावध राहणे, सोशल मीडियाचा योग्य वापर, मोबाईलचा अतिरेक आणि मुलींची सुरक्षितता याबाबत मार्गदर्शन केले. सायबर गुन्ह्यांपासून सुरक्षित राहण्यासाठी अनोळखी व्यक्तींशी ऑनलाइन संपर्क टाळावा, वैयक्तिक माहिती शेअर करू नये आणि सोशल मीडिया वापरताना सतर्क राहावे, असे त्यांनी सांगितले. कोणत्याही प्रकारचा त्रास झाल्यास घाबरून न जाता पालक, शिक्षक अथवा पोलिसांची मदत घ्यावी, असा सल्लाही त्यांनी दिला. पोलीस उपनिरीक्षक रेवती भोसले यांनी आपल्या एमपीएससी परीक्षेच्या अभ्यासाचा प्रवास विद्यार्थिनींसमोर मांडला. सातत्य, मेहनत, वेळेचे नियोजन आणि ध्येय निश्चित करून प्रामाणिक प्रयत्न केल्यास यश मिळवता येते, असे मार्गदर्शन त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना केले. यावेळी विद्यालयाचे प्राचार्य अजय भंडारी यांनी विद्यार्थिनींनी शिक्षणासोबतच शिस्त, नम्रता, चांगले संस्कार आणि सामाजिक जबाबदारी जोपासावी, असे आवाहन त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना केले. यावेळी संस्थेचे सचिव सतीश गुगळे, खजिनदार सुरेश कुचेरिया, विश्वस्त राजेंद्र मुथा, उपमुख्याध्यापक भारत गाडेकर, पर्यवेक्षक सुधाकर सातपुते, शिक्षक व शिक्षिका उपस्थित होते. यावेळी पोलीस उपनिरीक्षक रेवती भोसले यांचा संस्थेच्यावतीने सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमासाठी विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सोशल मीडियाचा वापर काळजीपूर्व करावा सायबर गुन्ह्यांपासून सुरक्षित राहण्यासाठी अनोळखी व्यक्तींशी ऑनलाइन संपर्क टाळावा, वैयक्तिक माहिती शेअर करू नये आणि सोशल मीडिया वापरताना सतर्क राहावे, असे त्यांनी सांगितले. कोणत्याही प्रकारचा त्रास झाल्यास घाबरून न जाता पालक, शिक्षक अथवा पोलिसांची मदत घ्यावी, असा सल्लाही त्यांनी यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना दिला.
Source link
मोबाइलच्या आहारी जाऊ नका; नेहमी ध्येयावर लक्ष केंद्रित करावे- भोसले:दामिनी पथकाच्या प्रमुख रेवती भोसले यांचा विद्यार्थिनींशी संवाद