Headlines

Devendra Fadnavis Statement; Vidyanand Bapat Attack & Disha Salian Case


विद्यानंद बापट यांना झालेल्या मारहाणीच्या घटनेची राज्याच्या गृह मंत्रालयाने गंभीर दखल घेतली असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार बापट यांना पोलिस संरक्षण देण्यात येणार आहे. यापुढे विद्यानंद बापट यांच्या सुरक्षेसाठी पोलिस बंदोबस्त तैना

.

पुण्यातील गणेशोत्सवात डीजे आणि ध्वनीप्रदूषणाविरोधात आवाज उठवणारे सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट यांच्यावर झालेली मारहाण अत्यंत अयोग्य असल्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. लोकशाहीत प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार असून पोलिसांनी या प्रकरणातील आरोपीला तत्काळ अटक केली असल्याचे त्यांनी सांगितले.

विधानभवनात आयोजित पत्रकारांच्या सर्वसमावेशक आरोग्य तपासणी शिबिराच्या उद्घाटनानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी बापट प्रकरणासह संतोष पंडित यांची अटक आणि दिशा सालियन प्रकरणाच्या सीबीआय तपासावर भाष्य केले.

मताचे उत्तर मारहाण असू शकत नाही; पुण्यात असे वाद नकोत

पुण्यातील घडामोडींवर आणि विद्यानंद बापट यांच्यावरील हल्ल्यावर विचारले असता मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “अशा पद्धतीने कोणावरही हल्ला किंवा मारहाण करणे पूर्णपणे अयोग्य आहे. प्रत्येकाला आपली भूमिका आणि मत मांडण्याचा अधिकार संविधानाने दिला आहे. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली आहे.”

“पुण्यासारख्या सांस्कृतिक शहरात अशा प्रकारचे वाद आणि हिंसक घटना शोभत नाहीत. सर्वांनी एकमेकांच्या भावना समजून घेतल्या पाहिजेत.”

उत्सवाचे पारंपारिकीकरण

“आपला गणेशोत्सव पुन्हा पारंपरिक पद्धतीकडे गेला पाहिजे, हीच आमची भूमिका आहे. पहिल्याच वर्षी कदाचित 100 टक्के बदल होणार नाही, मात्र उत्सवाचे स्वरूप पारंपरिक आणि शांततापूर्ण ठेवण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करणे गरजेचे आहे.”

दिशा सालियनप्रकरणी सीबीआय चौकशीवर प्रतिक्रिया

दिशा सालियन प्रकरणाचा तपास मुंबई उच्च न्यायालयाने केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (CBI) सोपवल्याच्या निर्णयावर फडणवीस म्हणाले, “मुंबई पोलिसांनी यापूर्वीच या प्रकरणाचा सखोल तपास पूर्ण करून आपला अहवाल सादर केला होता. परंतु उच्च न्यायालयाला कदाचित यामध्ये काही तांत्रिक बाबींची पूर्तता होणे बाकी आहे किंवा आणखी काही दिशेने तपास आवश्यक वाटला असावा, त्यामुळे न्यायालयाने हा तपास सीबीआयकडे वर्ग केला आहे,” असे त्यांनी नमूद केले.

पत्रकारांसाठी आरोग्य शिबिर; वर्षभर मदतीसाठी स्वतंत्र समन्वय अधिकारी

दिवस-रात्र वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांच्या आरोग्यासाठी विधानभवनात मुख्यमंत्री सहायता निधीच्या वतीने विशेष तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. राज्यातील 11 प्रमुख पत्रकार संघटनांनी एकत्र येऊन घेतलेल्या या शिबिराचे त्यांनी मनापासून कौतुक केले.

२४/७ काम करणाऱ्यांसाठी सुविधा

“पत्रकारांचे आयुष्य संघर्षाचे आणि अनियमिततेचे असते. रस्त्यावर तासन्तास उभे राहणाऱ्या कॅमेरामॅनसाठी व्हेरिकोज व्हेन्सवरील स्टॉकिंग्ज, इमर्जन्सी किट्स आणि तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत तपासणीची उत्तम सोय या ठिकाणी करण्यात आली आहे.” शिबिरानंतरही गरज पडल्यास शस्त्रक्रिया किंवा उपचारांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत केली जाईल. पत्रकारांना आणि त्यांच्या कुटुंबियांना वर्षभर वैद्यकीय मदतीत समन्वय साधण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधी कक्षात एक ‘स्वतंत्र समर्पित अधिकारी’ नियुक्त करण्यात आला असल्याची माहिती त्यांनी दिली.

हेही वाचा…

पुण्यात डीजेविरोधात आवाज उठवणाऱ्या विद्यानंद बापटांवर हल्ला: वडेट्टीवार, पवार, अंधारेंकडून संताप व्यक्त; पोलिस संरक्षणाची मागणी

पुण्यातील गणेशोत्सवात डीजेच्या कर्णकर्कश आवाजाला आणि ध्वनिप्रदूषणाला जाहीर विरोध करून राज्यभरात चर्चेत आलेले पर्यावरणप्रेमी विद्यानंद बापट यांना टिळक रस्त्यावरील कशाळे चौकात बेदम मारहाण करण्यात आली आहे. एका वृत्तवाहिनीला मुलाखत देत असताना आणि नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेत असताना अचानक आलेल्या 4 ते 5 तरुणांनी त्यांच्यावर हल्ला चढवला. या घटनेमुळे पुणे शहरात मोठी खळबळ उडाली असून संताप व्यक्त केला जात आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.