Headlines

ठाण्यामध्ये स्कूटीच्या डिकीतून साडेपाच कोटींचे ‘एमडी’ जप्त:दोन वेगवेगळ्या कारवाईत 4 तस्करांना पोलिसांनी केली अटक




ठाणे शहर पोलिस आयुक्तालयाच्या अमली पदार्थविरोधी पथकाने (गुन्हे शाखा) ड्रग्ज तस्करांचे मोठे रॅकेट उद्ध्वस्त करत आंतरजिल्हा नेटवर्कवर धडक कारवाई केली आहे. घोडबंदर रोड आणि कोपरी परिसरात मारलेल्या दोन वेगवेगळ्या धाडींमध्ये पोलिसांनी तब्बल ५ कोटी ६६ लाख ३७ हजार २९० रुपयांचे ‘एमडी’ (मेफेड्रॉन) ड्रग्ज जप्त केले असून, याप्रकरणी ४ मुख्य आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. पहिली कारवाई स्कूटीच्या डिकीतून ३.३४ कोटींचे ड्रग्ज जप्त ठाणे गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त अमरसिंह जाधव यांनी सांगितले की, १ सप्टेंबर रोजी मिळालेल्या गुप्त बातमीच्या आधारे पोलिसांनी घोडबंदर रोडवरील गायमुख बसस्टॉपजवळ सापळा रचला. तेथे संशयितरीत्या आलेल्या मोजीम अब्दुल्ला शेख (४१, रा. मीरा रोड) आणि तबरेज अब्दुल्ला शेख (५१, रा. ठाणे) यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या स्कूटीची (MH/04/LG/5906) पाहणी केली असता डिकीत लपवून ठेवलेला १ किलो ६७१ ग्रॅम एमडी ड्रग्जचा साठा आढळला. याप्रकरणी कासारवडवली पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवून आरोपींना पोलिस कोठडीत पाठवण्यात आले. दुसरी कारवाई बॅकवर्ड लिंकद्वारे मुख्य पुरवठादाराला नवी मुंबईतून बेड्या: दुसऱ्या कारवाईत कोपरी येथील बीएसएनएल कार्यालयाजवळ अब्दुल रहमान मोईद्दीन कादर शेख (३३, रा. गोवंडी) याला १ किलो १५२ ग्रॅम एमडी ड्रग्जसह (किंमत २,३०,४०,०००/-) रंगेहात पकडण्यात आले. अब्दुल रहमानच्या चौकशीतून मिळालेल्या सुगाव्यावरून ड्रग्जचा मुख्य पुरवठादार आफ्रीदी मोहम्मद वली शेख (२७, रा. सीवूड्स, नवी मुंबई) यालाही पोलिसांनी अटक केली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *