![]()
पंढरपूर सांगोला तालुक्याचे ११ वेळेस नेतृत्व करणारे ज्येष्ठ नेते स्व. गणपतराव ( आबा ) देशमुख यांनी सुरु केलेला “आमदारांचा गावात मुक्काम” हा उपक्रम आता माढा विधानसभा मतदार संघाचे आमदार अभिजित पाटील यांनी पुन्हा नव्या जोमाने सुरू केला आहे. वीस वर्षांपूर्वी गणपत आबांनी राबवलेले अभियान आता आ. अभिजित पाटलांनी सुरुवात केल्यामुळे मतदारसंघात “गणपत आबांनंतर आता अभिजित आबा” अशी चर्चा रंगू लागली आहे. प्रशासकीय यंत्रणा थेट ग्रामपंचायतीच्या दारात ! आ. अभिजित पाटील यांनी आमदार मुक्कामी : आपल्या गावी’ हे अभियान हाती घेतले आहे. या अभियानांतर्गत आ. पाटील स्वतः मतदार संघातील गावात मुक्कामी जात आहेत. ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळांच्या प्रांगणातच जनतेचा दरबार भरवला जातो. आलेगाव बुद्रुक, तुंगत, देवडे या गावात आजवर आ. पाटील यांनी मुक्काम ठोकला आहे. आणि यावेळी तहसीलदार यांच्यापासून ते ग्रामसेवक, तलाठी इथपर्यंत प्रशासकीय अधिकारी उपस्थित राहत आहेत. यावेळी लोकांच्या पाणंद रस्त्यापासून ते विजेचे डीपी आणि शाळा, विविध प्रकारचे दाखले आणि महसुली, कृषी, पोलिस, आरोग्य, सामाजिक न्याय विभाग, ग्रामपंचायत, योजना संदर्भात लोकांच्या प्रश्नांवर चर्चा होत आहे. गावातील महिला, वृद्ध, शेतकरी व तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपले प्रश्न मांडत आहेत. समस्या सोडविण्यासाठीही जनतेच्या दारात ^निवडणूक आल्यानंतर मत मागायला जसे गावोगावी जातो, तसेच समस्या सोडविण्यासाठीही जनतेच्या दारात गेलं पाहिजे. त्यामुळेच ‘आमदार मुक्कामी, आपल्या गावी’ या अभियानातून जनतेचा थेट संवाद, प्रशासनाचा समन्वय आणि समस्यांचे तत्काळ निराकरण यावर माझा भर राहणार आहे.” -आ.अभिजीत आबा पाटील, माढा, विधानसभा मतदारसंघ सार्वजनिक ठिकाणी रात्रीचा मुक्काम अन् कार्यकर्त्यांसोबत जेवण, त्यावेळीच गप्पांची मैफल लोकांच्या प्रश्नांवर उशिरापर्यंत चर्चा झाल्यानंतर तिथेच सर्वांसोबत जेवण करून आमदार पाटील गावातील सार्वजनिक ठिकाणी सतरंजी टाकून मुक्काम ठोकत आहेत. स्वतः आमदार गावात येऊन जाणून घेतात, अधिकाऱ्यांना समक्ष भेटता येते, प्रश्न मांडता येतात त्यामुळे ग्रामस्थ हि समाधानी होत आहेत.
Source link
गणपतरावांनंतर अभिजित पाटील "मुक्कामी':सांगोला मतदारसंघामध्ये आमदारांचा गावातच मुक्काम पुन्हा चर्चेत