Headlines

Sanjay Raut Attacks Devendra Fadnavis Over DJ Ban Controversy


राज्यात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या डीजे व लेझर लाइट्सच्या वादावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते तथा खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. “नागपुरात पोलिस आयुक्तांनी डीजे आणि लेझर

.

भाजपमध्ये बंडाळी; केंद्रात उपपंतप्रधान पदाची निर्मिती होणार?

राष्ट्रीय राजकारणातील घडामोडींवर मोठा दावा करताना संजय राऊत म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केंद्रीय मंत्रिमंडळात मोठा फेरबदल करायचा आहे, मात्र भाजपमधील अंतर्गत बंडाळीमुळे तो रखडला आहे. पक्षातील चार मूळ आणि ज्येष्ठ मंत्र्यांनी राजीनामे देण्यास नकार दिला असून, ‘आधी अमित शहा यांचा राजीनामा घ्या’ अशी थेट भूमिका या मंत्र्यांनी घेतली आहे.”

वाउदा

संघाची उपपंतप्रधान पदासाठी मागणी

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (RSS) अशी इच्छा आहे की मंत्रिमंडळात ‘उपपंतप्रधान’ हे पद निर्माण करून त्या जागी संघाच्या विचारांचा एक तडफदार तरुण चेहरा आणला जावा, जो भविष्यातील वारसदार ठरेल. या पदासाठी फडणवीसांच्या नावाची चर्चा असल्यास त्यांना मराठी माणूस म्हणून आपल्या शुभेच्छा आहेत, असा टोला त्यांनी लगावला.

दिल्लीच्या वाऱ्या कशासाठी?

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना दर 72 तासांनी दिल्लीत का जावे लागते? शिवसेना ही ‘मातोश्री’ आणि शिवसेना भवनातून चालते, मात्र अमित शहा यांनी स्थापन केलेल्या मिंधे गट आणि अजित पवार गटाला आदेश घेण्यासाठी दिल्लीचे उंबरठे झिजवावे लागतात, अशी टीका त्यांनी केली.

नागपूरला एक, तर पुण्याला वेगळा नियम का? गृहमंत्र्यांनी धोरणात्मक निर्णय घ्यावा

पुण्यात डीजेविरोधात आवाज उठवणारे सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट यांच्यावरील हल्ला आणि नागपुरातील डीजेबंदीच्या पार्श्वभूमीवर राऊत म्हणाले, “नागपूरच्या पोलीस आयुक्तांनी (विश्वास नांगरे पाटील) थेट १ नोव्हेंबरपर्यंत डीजे आणि लेझरवर बंदीचा धाडसी निर्णय घेतला. पुण्याचे सध्याचे पोलीस आयुक्त पूर्वी नागपूरचेच आयुक्त होते आणि ते सरकारचे लाडके आहेत, मग ते पुण्यात अशी भूमिका का घेत नाहीत? नागपूरला वेगळा न्याय, पुण्यात वेगळा आणि मुंबईत वेगळा, याला कसली कायद्याची चौकट म्हणायची?”

डीजे आणि लेझर लाईट्समुळे ज्येष्ठ नागरिक, रुग्ण आणि लहान मुलांचे आरोग्य धोक्यात येते, विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होतो. त्यामुळे गृहमंत्र्यांनी केवळ कायद्याच्या चौकटीची भाषा न करता संपूर्ण महाराष्ट्रासाठी एकच ठोस आणि धोरणात्मक निर्णय जाहीर करावा. पुण्यात बापट यांच्यावर झालेला हल्ला आणि सामाजिक कार्यकर्ते संतोष पंडित यांना मध्यरात्री १ वाजता घरात घुसून केलेली अटक यावरून राज्यातील गृह खाते नक्की काय करत आहे, असा संतप्त सवाल त्यांनी केला.

7.8% जीडीपीचा दावा आभासी; आकडेवारी मांडून पत्रकारांसमोर या

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 7.8 टक्के जीडीपी वाढीच्या दाव्याची राऊतांनी खिल्ली उडवली. “या सरकारचे सगळेच आभासी आहे. स्वतःला ‘नॉन-बायोलॉजिकल’ आणि देवाचा अवतार समजणाऱ्यांना आभासी गोष्टीतच आनंद मिळतो. परदेश दौऱ्यांवरून रात्री १२ वाजता रील्स बनवून जीडीपी वाढल्याचे सांगण्यापेक्षा देशात येऊन पत्रकारांसमोर आर्थिक आकडेवारी मांडण्याची हिंमत दाखवावी.”

“भाजप नेते रस्त्यांचे जाळे निर्माण केल्याचा दावा करतात; मग त्यांनी पुण्यावरून कोल्हापूरला किंवा मुंबई-गोवा रस्त्याने जाऊन पाहावे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून मुंबईत पोहोचायला मला अडीच तास लागले. खड्डे आणि वाहतूक कोंडी हेच यांचे खरे इन्फ्रास्ट्रक्चर आहे,” असा घणाघात त्यांनी केला.

हेही वाचा…

डीजेच्या आवाजामुळे सणाचे गांभीर्य जाते; बापटांवरील हल्ला लोकशाहीवर: पोलिस आयुक्त अन् राज्य सरकारने हे प्रकरण गांभीर्याने घ्यावे- शरद पवार

विद्यानंद बापट यांना मी काही ओळखत नाही, पण ते जे काही बोलत आहेत त्याला अर्थ आहे. कुठलाही सण हा लोकांना आनंद देणारा असला पाहिजे. डीजेच्या आवाजामुळे त्या सणाचे गांभीर्य निघून जाते, कोणी मत व्यक्त केले म्हणून त्यांच्यावर हल्ला झाला तर हा हल्ला माझ्यामते लोकशाही आणि मूलभूत अधिकारावर आहे, असे शरद पवार यांनी म्हटले आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.