![]()
स्त्रीशिक्षणाची पहिली पहाट उजाडवणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पावन जन्मभूमीत, त्यांच्याच प्रेरणादायी जीवनपटावर आधारित ‘कवाड’ या आगामी ऐतिहासिक कादंबरीच्या मुखपृष्ठाचा अनावरण सोहळा अत्यंत उत्साहात आणि भावूक वातावरणात पार पडला. प्रसिद्ध कथाकार आणि लेखक सप्तर्षी माळी यांनी या कादंबरीचे लेखन केले आहे. अक्षरबंध प्रकाशनातर्फे प्रकाशित होणाऱ्या या पुस्तकाच्या मुखपृष्ठाचे अनावरण ऑल इंडिया सैनी समाजाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष व महात्मा फुले द्विशताब्दी जयंती उत्सव समितीचे उपाध्यक्ष (काँग्रेस) विजय राऊत, ऑल इंडिया सैनी सेवा समाजाचे पुणे जिल्हाध्यक्ष पन्नालाल टाक, प्रकाशक प्रवीण जोंधळे आणि स्वतः लेखक सप्तर्षी माळी यांच्या हस्ते करण्यात आले. या सोहळ्याला सौ. चारुशीला माळी, सौ. प्रीती जोंधळे, सावित्रीबाई फुले शिल्पसृष्टीच्या रुपाली नेवसे-पाटील, स्मारकाचे विशाल नेवसे-पाटील, कुलदीप वानखेडे यांच्यासह नायगावचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. साहित्यातून विचारांचा जागर लेखक सप्तर्षी माळी यांचा साहित्यिक प्रवास इतिहास आणि वर्तमान यांची योग्य सांगड घालणारी सप्तर्षी माळी यांची ‘कवाड’ ही कादंबरी लवकरच वाचकांच्या भेटीस येत असून, साहित्यिक वर्तुळात आणि सावित्रीमाईंच्या विचारप्रेमींमध्ये या पुस्तकाबद्दल मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. माळी यांनी यापूर्वीही आपल्या लेखनातून वेगळी छाप पाडली आहे. ती अशी…
Source link
सावित्रीमाईंच्या नायगावातून साहित्याचा नवा अध्याय!:लेखक सप्तर्षी माळी यांच्या ‘कवाड’च्या मुखपृष्ठाचे अनावरण; क्रांतिज्योतीच्या कार्याला मिळणार उजाळा