![]()
छत्रपती संभाजीनगर|मुकुंदवाडी रेल्वेस्थानकावर शनिवारी (५ सप्टेंबर) दुपारी चार वर्षांच्या चिमुकल्याला कडेवर घेऊन धावत्या तपोवन एक्स्प्रेससमोर उडी घेणाऱ्या महिलेची अखेर ओळख पटली आहे. पल्लवी अक्षय बनकर (२६) आणि दक्ष अक्षय बनकर (४, दोघे रा. शिवाजी कॉलनी,
.
पल्लवी यांच्या हातावर बदामाच्या आकारात गोंदलेले ‘अक्षय’ हे नाव त्यांच्या पतीचेच होते. अवघ्या दीड महिन्यापूर्वीच पतीचे निधन झाल्याने याच विरहातून आलेल्या नैराश्यातून पल्लवी यांनी हे टोकाचे पाऊल उचलले.
हातावरील ‘अक्षय’ नावावरून पटली ओळख
शनिवारी दुपारी अडीचच्या सुमारास मुकुंदवाडी स्थानकावर ही घटना घडली होती. या भीषण अपघातानंतर पोलिसांनी दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी घाटीत ठेवले होते. मात्र, महिलेच्या हातावर बदामाच्या आकारात ‘अक्षय’ असे नाव गोंदलेले होते. याच खुणेवरून पोलिस ओळख पटवण्याचे काम करत होते. अखेर रविवारी (६ सप्टेंबर) दुपारनंतर नातेवाइकांनी घाटीत जाऊन मृतदेहांची पाहणी केली आणि हे मृतदेह पल्लवी बनकर व त्यांच्या मुलाचे असल्याचे स्पष्ट झाले.