![]()
संतांची भूमी असलेल्या पैठण येथे संत विचारांचा प्रसार करण्यासाठी आणि संस्कारक्षम पिढी घडविण्यासाठी १९८१ मध्ये घोषित करण्यात आलेल्या संतपीठाला तब्बल चार दशकांहून अधिक काळ उलटूनही पूर्णत्वाची प्रतीक्षा कायम आहे. विद्यार्थ्यांसाठी लाखो रुपये खर्चून उभारलेली वसतिगृहाची नवीन इमारत तयार आहे. मात्र तिचे दरवाजे अद्याप विद्यार्थ्यांसाठी खुले झालेले नाहीत. संतपीठात केवळ मर्यादित अभ्यासक्रम सुरू असल्याने मूळ संकल्पनेनुसार व्यापक स्वरूपातील संतपीठाचे स्वप्न अधुरेच राहिले आहे. त्यामुळे ‘संतांची भूमी, संतपीठाची घोषणा आणि चार दशकांची प्रतीक्षा’ अशी विसंगत परिस्थिती निर्माण झाली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाकडे संतपीठाचा ताबा असून विद्यापीठाचे याकडे दुर्लक्ष झाले असल्याचे समजते. सध्या संतपीठात केवळ सहा महिने आणि एका वर्षाचे मर्यादित अभ्यासक्रम चालवले जातात. संतपीठाला मूळ संकल्पनेनुसार व्यापक स्वरूप देऊन विविध श्रेणीतील पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करावेत, अशी मागणी प्रा. संतोष गव्हाणे, रोटरी क्लबचे अध्यक्ष पवन लोहिया, बलराम लोळगे, नगरसेवक जितू परदेशी, बजरंग लिंबोरे आणि फाजल टेकडी यांनी आमदार विलास भुमरे यांच्याकडे केली आहे.
Source link
घोषणा होऊन चार दशक उलटले:पैठण संतपीठाला 45 वर्षांची प्रतीक्षा; वसतिगृह तयार, विद्यार्थी मात्र वंचितच, मर्यादित अभ्यासक्रमामुळे विद्यापीठाची संकल्पना अधुरी