एमपीएससी पेपरफुटी प्रकरणामुळे राज्यभरात विद्यार्थ्यांच्या आंदोलनांचा भडका उडाला असून, विरोधकांनीही सत्ताधाऱ्यांविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर पुण्यात सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या तीव्र आंदोलनाची दखल घेत, राष्ट्रवादी काँग्रेस श
.
रोहिणी खडसे यांनी ट्विट करत म्हटले की, MPSC परीक्षांमधील पेपरफुटी आणि भोंगळ कारभाराविरोधात पुण्यात हजारो विद्यार्थ्यांनी काढलेला ‘आक्रोश मोर्चा’ हा सरकारच्या अपयशाचा ढळढळीत पुरावा आहे. या मोर्चातील मुलं ही शेतकऱ्यांची आणि कष्टकऱ्यांची मुलं आहेत. मुलांच्या शिक्षणासाठी काहींच्या वडिलांनी जमीन विकली आहे तर काहींच्या वडिलांनी इतकं कर्ज काढले आहे की आयुष्यभर कष्ट केले तरी फेडू शकणार नाही. पेपर फोडणाऱ्यांनी त्यांच्या स्वप्नांची राखरांगोळी केली आहे.
तसेच माय बाप सरकाराला जनाची नाही मनाची तरी असेल तर त्यांनी या मोर्चाकडे दुर्लक्ष न करता तातडीने हालचाली कराव्यात आणि लाखो तरुण-तरुणींच्या भवितव्याशी खेळणाऱ्या MPSC चे अध्यक्ष आणि सचिवांनी तात्काळ राजीनामा घ्यावा, अशी मागणी देखील रोहिणी खडसे यांनी केली आहे.
दरम्यान, राज्यभरात खळबळ उडवून देणाऱ्या ‘एमपीएससी’च्या औषध निरीक्षक पेपरफुटी प्रकरणातील कारवाईला आता वेग आला असून, तपासात अनेक धक्कादायक माहिती समोर येत आहे. याप्रकरणी पोलिसांनी नंदुरबारमधून ऋतुजा पाटील हिला चौकशीअंती अटक केली आहे. तपासादरम्यान हाती लागलेल्या तब्बल 270 पानांच्या व्हॉट्सॲप चॅट्समुळे या प्रकरणाला एक नवी दिशा मिळाली असून, पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने आरोपी ऋतुजाचा मोबाईल थेट उल्हास नदीत फेकण्यात आल्याचा खळबळजनक दावाही करण्यात आला आहे.
या संदर्भातील ही देखील बातमी वाचा
MPSC विद्यार्थ्यांचा पुण्यात आक्रोश मोर्चा!:सुप्रिया सुळे आणि रोहित पवारांसह हजारो विद्यार्थी रस्त्यावर; सखोल चौकशीची मागणी

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) कारभारातील कथित ढिसाळपणा, पेपरफुटी आणि निकालातील गोंधळाविरोधात आज पुण्यात एमपीएससीच्या हजारो विद्यार्थ्यांनी भव्य ‘आक्रोश मोर्चा’ काढला. ओंकारेश्वर मंदिर ते पुणे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आलेल्या या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी-विद्यार्थिनी सहभागी झाले. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), शिवसेना (ठाकरे गट), काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांसारख्या प्रमुख राजकीय पक्षांनी या आंदोलनाला आपला जाहीर पाठिंबा दर्शवला. मोर्चामध्ये राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार आणि स्थानिक ठाकरे गटाचे शिवसेना नेते हे प्रामुख्याने सहभागी झाले.