Headlines

MPSC Chairman Vivek Bhimanwar Challenges Paper Leak Allegations


नीट परीक्षेचा पेपरफुटी प्रकरण ताजे असतानाच एमपीएससीच्या पेपरफुटीचे प्रकरण समोर आले. त्यानंतर राज्यात विद्यार्थ्यांनी निदर्शने करण्यास सुरुवात केली. आज पुण्यात मोठ्या प्रमाणात विद्यार्थी, विद्यार्थिनी तसेच विरोधी पक्षातील नेत्यांनी मोर्चा काढला. सरकार

.

विवेक भीमनवार म्हणाले, एमपीएससी पेपरफुटीच्या प्रकरणात सातत्याने अनुचित आरोप माझ्याविरोधात केले जात आहेत. यासंदर्भात दि. 2 सप्टेंबर 2026 रोजी स्वयंस्पष्ट निवेदन जारी करण्यात आले होते. औषध निरीक्षक परीक्षेशी संबंधित प्रश्नपत्रिका फुटीचा घटनाक्रम हा मी रुजू होण्यापूर्वीचा आहे, हे मी आधीच त्यात स्पष्ट केले आहे. याबाबत आयोगाने तक्रार प्राप्त होताच पोलिसांत तक्रार केली आणि त्याचा तपास सुरु आहे. अशा घटनांची पुनरावृत्ती न होण्यासाठी एक उच्चस्तरिय समिती एमपीएससीने गठीत केली आहे आणि राज्य सरकारनेही एक उच्चाधिकार समिती गठीत करुन विभागीय स्तरावर जाऊन विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांच्याशी सल्लामसलतीची प्रक्रिया आरंभ केली आहे.

माझ्याविरोधात वैयक्तिक आणि प्रतिमा मलिन करणारे राजकीय आरोप

पुढे विवेक भीमनवार म्हणाले, वस्तुस्थिती स्पष्ट करुनही सातत्याने माझ्याविरोधात वैयक्तिक आणि प्रतिमा मलिन करणारे राजकीय आरोप होत असल्याने मी अत्यंत व्यथित आहे. मी पदाची सूत्रे स्वीकारल्यापासून एमपीएससीमध्ये अनेक सुधारणा केल्या. स्पर्धा परीक्षेच्या 8 आणि सरळसेवा भरतीच्या 76 चाळणी परीक्षा अशा एकूण 84 परीक्षा यशस्वीपणे घेतल्या आहेत. शासनाकडून मागणी होण्यापासून ते निकाल जाहीर होईस्तोवर अनेक गुणात्मक आणि रचनात्मक सुधारणा केल्या. यामुळे 18 ते 21 दिवसांत निकाल जाहीर करणे शक्य झाले. निकाल जाहीर होण्यातील प्रदीर्घ विलंब कमी केला आणि 1 महिन्यात निकाल जाहीर करता येईल, असे नियोजन केले असल्याची माहिती भीमनवार यांनी दिली आहे.

माझ्या विरोधात पुरावा दिला तर राजीनामा देणार

तसेच अजूनही बर्‍याच सुधारणा नियोजनाच्या पातळीवर आहेत. उद्देश हाच की महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची प्रतिष्ठा अबाधित रहावी आणि प्रयत्नांची पराकाष्ठा करणार्‍या विद्यार्थ्यांना यथोचित न्याय मिळावा, त्यांच्या कष्टाचे चीज व्हावे. पारदर्शी आणि निष्पक्ष अशीच व्यवस्था उभारण्याचा मी प्रयत्न सातत्याने करतो आहे आणि करीत राहीन. तथापि माझ्याविरोधात कुणी एक जरी पुरावा दिला, तर एक क्षण सुद्धा मी या पदावर राहणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

या संदर्भातील ही देखील बातमी वाचा..

MPSC विद्यार्थ्यांचा पुण्यात आक्रोश मोर्चा!:सुप्रिया सुळे आणि रोहित पवारांसह हजारो विद्यार्थी रस्त्यावर; सखोल चौकशीची मागणी

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) कारभारातील कथित ढिसाळपणा, पेपरफुटी आणि निकालातील गोंधळाविरोधात आज पुण्यात एमपीएससीच्या हजारो विद्यार्थ्यांनी भव्य ‘आक्रोश मोर्चा’ काढला. ओंकारेश्वर मंदिर ते पुणे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आलेल्या या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी-विद्यार्थिनी सहभागी झाले. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), शिवसेना (ठाकरे गट), काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांसारख्या प्रमुख राजकीय पक्षांनी या आंदोलनाला आपला जाहीर पाठिंबा दर्शवला. मोर्चामध्ये राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार आणि स्थानिक ठाकरे गटाचे शिवसेना नेते हे प्रामुख्याने सहभागी झाले. वाचा सविस्तर



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.