![]()
दुष्काळजन्य परिस्थितीमुळे शेतकरी, शेतमजूर आणि सामान्य नागरिक आर्थिक कचाट्यात सापडले असून नागरिकांच्या हितासाठी खामगाव तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा यासह इतर मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सोमवारी उपविभागीय अधिकारी यांना मोर्चा काढून निवेदन देण्यात आले. अत्यल्प पावसामुळे खामगाव तालुक्यात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे खामगाव तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा. मजुरांच्या हाताला काम देण्यासाठी स्थानिक पातळीवर शासनामार्फत कामे उपलब्ध करून द्यावीत. शेतातील पिकांना आवश्यक पाणी मिळण्यासाठी वीजपुरवठा दिवसभर व नियमित करण्यात यावा. कर्जमाफी जाहीर झाली असली तरी जाचक अटीमुळे अनेक शेतकरी कर्जमाफी पासून वंचित राहिलेले आहेत तरी सर्व शेतकरी बांधवांची सरसकट कर्जमुक्ती करावी यासह इतर मागण्यांचा निवेदनात समावेश आहे. निवेदनावर वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष शांताराम पाटेखेडे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष विशाखा सावंग, तालुका महासचिव बाळू मोरे, शहराध्यक्ष आकाश सरदार, विनेश इंगळे, गौतम सुरवाडे,गौतम नाईक, गजानन हिवराळे,प्रशिक उमाळे, गौतम वाकोडे, महेंद्र तायडे, राजू हिवराळे, विजय वानखडे, रामकृष्ण हिवराळे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत.
Source link
पावसाअभावी खामगाव तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा:वंचित बहुजन आघाडीतर्फे एसडीओंना निवेदन