![]()
गौरी-गणपती उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने विशेष बससेवेचे नियोजन केले आहे. कोकणातील प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी संभाजीनगर विभागातील आठ आगारांतून ३०७ विशेष बसेस कोकणात पाठवण्यात आ
.
विभागातून पाठवण्यात आलेल्या ३०७ बसेसमध्ये २७२ साध्या आणि ३५ जिजाऊ बसेसचा समावेश आहे. या बसेस पुढील ११ दिवस कोकणातच सेवेत असणार आहेत. कोकणात बसेस वळवल्यामुळे मुंबई, पुणे, नाशिक, जळगाव, नागपूर, धुळे, सोलापूर, लातूर, कोल्हापूर आणि नांदेड यांसारख्या प्रमुख आणि लांब पल्ल्याच्या मार्गांवरील रोजच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. या काळात दररोजच्या तब्बल ९४७ फेऱ्या आणि सुमारे १,१२,८४४ किलोमीटरचा प्रवास प्रभावित होणार आहे. या रद्द झालेल्या फेऱ्यांसाठी एसटी प्रशासनाकडून कोणतीही पर्यायी व्यवस्था करण्यात आलेली नाही. त्यामुळे प्रवाशांनी उपलब्ध गाड्यांचाच अंदाज घेऊन प्रवास करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. या बसेस चाकरमान्यांना घेऊन रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात जाणार आहेत.
१,१२,८४४ किमीचा प्रवास फेऱ्या रद्दमुळे प्रभावित होणार कोकणात बसेस वळवल्यामुळे मुंबई, पुणे, नाशिक, जळगाव, नागपूर, धुळे, सोलापूर, लातूर, कोल्हापूर आणि नांदेड यांसारख्या प्रमुख आणि लांब पल्ल्याच्या मार्गांवरील रोजच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. या काळात दररोजच्या तब्बल ९४७ फेऱ्या आणि सुमारे १,१२,८४४ किलोमीटरचा प्रवास प्रभावित होणार आहे.
मागणी वाढल्यास अतिरिक्त बसेसची सोय केली जाणार गणेशोत्सवाच्या काळात प्रवाशांची गर्दी विचारात घेऊन कोकणासाठी विशेष गाड्यांचे नियोजन केले आहे. या काळात लांब पल्ल्याच्या फेऱ्या बंद असल्या तरी ग्रामीण मुक्काम व शालेय फेऱ्या सुरूच राहतील. मागणी वाढल्यास अतिरिक्त सोय केली जाईल, असे विभागीय वाहतूक अधिकारी संतोष घाणे, विभागीय वाहतूक अधीक्षक गजानन मडके यांनी सांगितले.
प्रवाशांची गैरसोय सहन केली जाणार नाहीत : जिल्ह्यातून एवढ्या मोठ्या प्रमाणात बसेस कोकणात पाठवल्यामुळे जिल्ह्यातील दळणवळणावर परिणाम झाला आहे. तालुक्यातील मुख्य मार्गांवरील बसफेऱ्या अचानक कमी झाल्याने दैनंदिन प्रवाशांचे हाल होत आहेत. ग्रामीण भागातील प्रवाशांचा हा खोळंबा त्वरित थांबवण्यात यावा आणि फेऱ्या सुरळीत कराव्यात, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितू परदेशी आणि नगरसेवक बजरंग लिंबोरे यांनी केली आहे. दरम्यान, या बसेस ११ दिवस कोकणात राहणार असल्याने जिल्ह्यातील प्रवाशांची गैरसोय होणार आहे.