Headlines

चॅटजीपीटीद्वारे बनवले ‘पीएमओ’चे बनावट ओळखपत्र:रोहन पारेखला 14 दिवस कोठडी, ‘पीएमओ’च्या नियुक्तीचा ईमेल आल्याचा आरोपीचा कांगावा उघड




पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्यादरम्यान स्वतःला पीएमओचा अधिकारी भासवून वांद्रे-कुर्ला संकुलातील (बीकेसी) व्हीव्हीआयपी सुरक्षेत घुसखोरी करू पाहणाऱ्या रोहन पारेखचा व त्याचा अंगरक्षक दिलीप कुंदे या दोघांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. पोलिस कोठडी संपल्याने त्यांना वांद्रे न्यायालयाने शुक्रवारी हजर करण्यात आले होते. दरम्यान, ‘पीएमओकडून नियुक्तीचा ईमेल आल्याने आपलीच फसवणूक झाली,’ असा बचावाचा दावा आरोपी रोहन करत होता; मात्र असा कोणताही ईमेल आलाच नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या पूर्वसंध्येला ७ सप्टेंबर रोजी रोहन मर्सिडीज कारमधून जिओ वर्ल्ड प्लाझात दाखल झाला होता. मेटल डिटेक्टर तपासणीवेळी अंगरक्षक कुंदेकडे परवानाधारक रिव्हॉल्व्हर आणि ६ जिवंत काडतुसे आढळली. सुरक्षा रक्षकांनी रोखताच रोहनने मोबाइलवर स्वतःला पीएमओचा ‘वर्ग-क’ अधिकारी दर्शवणारे डिजिटल ओळखपत्र दाखवले. नातेवाइकांमध्ये स्वतःचा रुबाब वाढवण्यासाठी रोहनने ‘चॅटजीपीटी’चा वापर करून पंतप्रधान कार्यालयाचे (पीएमओ) बनावट ओळखपत्र तयार केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे. इनसाइड स्टोरी: ७ लाखांची उधळपट्टी आणि एसपीजीचा बनाव लंडनमधून उच्च शिक्षण घेतलेल्या हिरे व्यापारी कुटुंबातील रोहन पारेखने घटनेच्या दिवशी मॉलमध्ये ७ लाख रुपयांची वैयक्तिक खरेदी केली होती. सुरक्षा रक्षकांनी हटकताच माजी सैनिक असलेल्या अंगरक्षक कुंदेने स्वतःला थेट पंतप्रधानांच्या सुरक्षेतील ‘एसपीजी’ जवान असल्याचे भासवून दबाव आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, सुरक्षा यंत्रणांच्या सतर्कतेमुळे हा हायप्रोफाइल बनाव काही मिनिटांतच उधळला गेला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *