Headlines

अकलूजमध्ये 67 वर्षांपूर्वीचे शिवरत्न मंडळ‎:तुकाराम महाराजांच्या पालखीवेळी राबवणारे मंडळ ईदच्या वेळीही उपक्रम राबवतेय‎



येथील जुन्या अकलूजमधील सामाजिक, राजकीय धार्मिक अशा सर्व कारणांसाठी प्रसिद्ध असलेल्या छोट्याशा विजय चौकात ६७ वर्षांपूर्वी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या नेतृत्वात तत्कालीन तरुणांनी निर्माण केलेल्या शिवरत्न गणेशोत्सव मंडळाची त्यांच्या

.

सुमारे ६७ वर्षांपूर्वी अकलूज हे तसे छोटेसे गाव होते. तर विजयसिंह मोहिते पाटील यांच्या नावाने निर्माण केलेला हा या गावातील एकमेव चौक होता. याच ठिकाणी बाबूराव सावंत, शिवाजी भुतनाळ, सदाशिव भोसले, सुरेश शेटे, शंकर गोरे, प्रताप मोहिते, उदय कोतमिरे, बापू देवकर, महिबुब मुलाणी, शेट्टीना धोत्रे आदी विविध जाती धर्माच्या तरुणांनी एकत्र येत विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या नेतृत्वाखाली या मंडळाची स्थापना केली. या गणेशोत्सव मंडळाने विविध आकर्षक देखाव्यांच्या माध्यमातून धार्मिक परंपरेबरोबरच सामाजिक सलोखा, राष्ट्रीय एकात्मता आणि समाजप्रबोधनाचीही परंपरा अद्याप राखली आहे. स्थापनेवेळी तत्कालीन कार्यकर्त्यांनी उत्सवासाठी शेंदरी रंगाची श्री गणेशाची मूर्ती आणली. तीच मूर्ती आजही उत्सवासाठी वापरली जात आहे. सुरुवातीपासूनच या मंडळात राबणाऱ्या कार्यकर्त्यांना मान देण्याची प्रथा सुरू केल्याने अनेकांना मंडळाच्या अध्यक्ष पदाची संधी मिळाली.

शहरांच्या धर्तीवर आकर्षक विद्युत रोषणाई, आरास,संगीत अकलूज व परिसरातील लोकांना दाखवले. पुढे रामायणातील सीतावाटिका, कुंभकर्णाची निद्रावस्था, महाभारतातील देखावे, संत तुकाराम महाराजांचे वैकुंठगमन अशा पौराणिक व धार्मिक असे हालते देखावे. शिवाय मंडळाच्या वतीने प्रथमच आयोजन केले. वृक्षारोपण, रक्तदान शिबिरे, थोर महापुरुषांच्या जयंती व पुण्यतिथीचे आयोजन शालेय विद्यार्थ्यांना खाऊ व शैक्षणिक साहित्याचे वाटप, तसेच ईदनिमित्त मुस्लिम बांधवांना सरबत वाटप केले जाते, असे

^शिवरत्न गणेशोत्सव मंडळ हे विजयदादांच्या नेतृत्वाखाली निर्माण झालेले मंडळ असल्याची जाणीव ठेवूनच पदाधिकारी काम करतात,त्यामुळेच आजही या मंडळात धार्मिक इतकेच मंडळाचे नेतृत्व करत आहे. शिवतेजसिंह मोहिते-पाटील, अध्यक्ष



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *